९ मार्च दिनविशेष - 9 March in History
९ मार्च दिनविशेष - 9 March in History

हे पृष्ठ 9 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 9th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • शिक्षक दिन: लेबेनॉन

महत्त्वाच्या घटना:

१७७६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एडम स्मिथ यांचे “द वेल्थ ऑफ नेशन्स” हे पुस्तक प्रकाशित झाले.

१७९६: नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.

१८२२: ला आजच्या दिवशी चार्ल्स एग ग्राहम यांनी कृत्रिम दातांचा पेटंट नोंदविला.

१९१६: आजच्या दिवशी जर्मनी ने पोतुर्गाल च्या विरोधात युद्धाची घोषणा केली.

१९४५: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.

१९५२: पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन

१९५९: बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.

१९५९: ’बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

१९८२: सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग

१९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने

१९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला ‘सरस्वती पुरस्कार’ उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

२००८: एस.सी.जमीर गोव्याचे राज्यपाल असताना त्यांनी आजच्या दिवशी महाराष्ट्राचा कारभार सुद्धा सांभाळला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४५४: अमेरिगो वेस्पुची,इटालियन खलाशी

१८२४: अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १८९३)

१८६३: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)

१८९९: ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)

१९१५: हिंदी भाषेचे प्रसिद्ध विचारक डॉ. नगेंद्र यांचा जन्म.

१९३०: डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक

१९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.

१९३३: अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.

१९३४: युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (मृत्यू: २७ मार्च १९६८)

१९३५: क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.

१९४३: रॉबर्ट जेम्स ऊर्फ ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (मृत्यू: १७ जानेवारी २००८)

१९५१: उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक

१९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

१९५६: शशी थरूर – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ 

१९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.

१९७२: भारतीय चित्रपट अभिनेते सुशांत सिंग यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

१९९७: हिंदी चित्रपटातील बाल कलाकार दरशील सफ़ारी चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास

१८५१: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)

१८८८: विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म: २२ मार्च १७९७)

१९६९: सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ’होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)

१९७१: के. असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक (जन्म: १४ जून १९२२)

१९७१: के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.

१९९२: मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)

१९९४: देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ३० मार्च १९०८)

१९९७: भारतीय राजनीतिज्ञ बेजवाड़ा गोपाल रेड्डी यांचे निधन.

२०००: उषा मराठे – खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (जन्म: २२ एप्रिल १९२९)

२०१२: जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *