२२ मार्च दिनविशेष - 22 March in History
२२ मार्च दिनविशेष - 22 March in History

हे पृष्ठ 22 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 22nd March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक जलजीवन दिवस

महत्त्वाच्या घटना:

१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली

१८८२: घातक संक्रमक बिमारी ‘टीबी’ ची ओळख झाली.

१८८८: इंग्लिश फुटबॉल लीग ची स्थापना झाली होती.

१८९०: भारतीय कलाबाज, जिम्नॅस्ट, बलून वादक, पॅराशूटिस्ट आणि देशभक्त रामचंद्र चटर्जी हे पैराशूट मधून उतरणारे पहिले व्यक्ती बनले.

१९२८: महाराष्ट्र साहित्य पत्रिकेची सुरुवात झाली

१९३३: डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.

१९४५: अरब लीगची स्थापना

१९४७: स्वातंत्र्य भारताचे शेवटील व्हायसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांचे भारतात आगमन झाले.

१९४९: जॉर्डन हा देश स्वतंत्र झाला

१९४९: माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात

१९५४: अमेरिकेतील मिशीगन शहराच्या साउथफिल्ड भागात पहिला शॉपिंग मॉल उघडण्यात आला.

१९६९: भारतीय पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करण्यात आली.

१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९८०: PETA ची स्थापना

१९९९: लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७९७: विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू: ९ मार्च १८८८)

१८६८: रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता, इलेक्ट्रॉनचा शोध, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१८८२: उर्दू वर्तमानपत्र ‘जमाना’ चे संस्थापक व समाजसुधारक मुंशी द्यानारायण निगम यांचा जन्मदिन.

१८८५: भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ गुलाम यजदानी, यांचा जन्मदिन.

१८९४: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी क्रांतिकारक सूर्यसेन यांचा जन्मदिन. सूर्यसेन यांनी चटगाव येथील शस्त्रास्त्र हल्ल्याचे नेतृत्व केले होते.

१९२४: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)

१९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)

१९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.

१९३१: बर्टन रिश्टर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.

१९४२: सर रिचर्ड स्टेफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात आले होते.

२०००: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेता भारतीय टेबल टेनिसपटू नैना जयस्वाल यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८३२: योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी. गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)

१९७१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व मासिक संपादक हनुमान प्रसाद पोद्दार यांचे निधन.

१९७७: भारतीय कम्युनिस्ट नेता तसेच, भारतीय स्वातंत्र्यसेनानी ए. के. गोपालन यांचे निधन.

१९८४: प्रभाकर आत्माराम पाध्ये – लेखक व पत्रकार (जन्म: ? ? १९०९)

२००४: बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म: ३ जुलै १९०९)

२००७: भारतीय तत्वज्ञानी वक्ते यू. जी. कृष्णमूर्ती यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *