१९ एप्रिल दिनविशेष - 19 April in History
१९ एप्रिल दिनविशेष - 19 April in History

हे पृष्ठ 19 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 19th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१४५१: मुघल सुलतान बहलोल लोदी यांनी दिल्लीवर आपला राज्यभिषेक केला. दिल्लीच्या शासक पदी जाणारे ते पहिले अफगाण सुलतान होते

१५२६: मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.

आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.
आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.

१५८७: सर फ्रांसिस ड्रेकने केडिझच्या बंदरात स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.

१७७०: ब्रिटीश खोजकर्ता, नाविक, मानचित्रकार आणि रॉयल नेवीचे कप्तान जेम्स कुक ऑस्ट्रेलिया देशांत जाणारे पहिले व्यक्ती बनले.

१७७५: अमेरिकन क्रांती – कॉँकॉर्ड व लेक्झिंग्टनची लढाई.

१८१०: व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

१८३९: १८३९चा लंडनचा तह – बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.

१९०४: कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात.

१९०९: जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.

१९१९: अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.

१९३६: पॅलेस्टाईनमध्ये उठाव.

१९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.

१९६०: दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.

१९६१: पिग्सच्या अखातातील आक्रमण – घुसखोरांचा पराभव.

१९७१: सियेरा लिओन प्रजासत्ताक झाले. सियाका स्टीवन्स राष्ट्राध्यक्षपदी.

१९७१: रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले.

१९७५: एक्स-रे खगोलशास्त्र, वैमानिकी आणि सौर भौतिकी येथे प्रयोग करण्यासाठी  भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला पहिला भारतीय उपग्रह आर्यभट याचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९७८: लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९८९: यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.

१९९३: वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडीयनच्या इमारतीस आग. ८१ ठार.

१९९५: ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.

१९९९: जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.

२०००: एर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.

२००५: जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.

२००६: अमेरिकन अंतराळ यात्री नील आर्मस्ट्रॉंग यांनी आणलेला चंद्राचा तुकडा त्यांना भेट देण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ
चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ

१३२०: पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.

१४५२: फर्डिनांड दुसरा, अरागोनचा राजा.

१७८०: सतराव्या शतकातील अवध प्रांताचे चौथे नवाब वजीरअली खान यांचा जन्मदिन.

१७९३: फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.

१८६८: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)

१८८२: गेतुइलो व्हार्गास, ब्राझिलचा पंतप्रधान.

१८९२: ताराबाई मोडक, भारतातील सुप्रसिध्द बालशिक्षणतज्ज्ञ.

१८९७: पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.

१९०३: इलियट नेस, अमेरिकन पोलिस.

१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)

१९२२: जर्मन लढाऊ वैमानिक एरिच हार्टमैन यांचा जन्मदिन.

१९३०: मालती पांडे, सुप्रसिद्ध गायिका.

१९३३: डिकी बर्ड, इंग्लिश क्रिकेटपंच.

१९३६: विल्फ्रीड मार्टेन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.

१९३७: जोसेफ एस्ट्राडा, फिलिपाईन्सचा अभिनेता व राष्ट्राध्यक्ष.

१९४६: ‘आंध्र पुरस्कार’ सन्मानित भारतीय शास्त्रीय गायिका तसचं, उस्ताद आमिर खान यांच्या अधिपत्याखाली प्रशिक्षण घेतलेल्या भारतीय शास्त्रीय गायिका कंकना बॅनर्जी यांचा जन्मदिन.

१९५०: भारताचे एकोणिसावे निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांचा जन्मदिन.

१९५७: मुकेश अंबानी, सुप्रसिद्ध उद्योगपती.

१९६८: अर्शद वारसी, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९६८: म्स्वाती तिसरा, स्वाझीलँडचा राजा.

१९७५: जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.

१९८७: मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

अनंत लक्ष्मण कान्हेरे,
अनंत लक्ष्मण कान्हेरे,

१०५४: पोप लिओ नववा.

१३९०: रॉबर्ट तिसरा, स्कॉटलंडचा राजा.

१५७८: उएसुगी केन्शिन, जपानी सामुराई.

१६८९: क्रिस्टीना, स्वीडनची राणी.

१८८१: बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८८२: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

१९०६: पिएर क्युरी, फ्रेंच संशोधक, नोबेल पुरस्कार विजेता.

१९१०: साली क्रांतिकारक कृष्णाजी गोपाल कर्वे यांना नशिक येथील ब्रिटीश जिल्हाधिकारी जॅक्सन यांना क्रांतिकारक अनंत कान्हेरे आणि विनायक नारायण देशपांडे यांच्या सोबत मिळून गोळ्या झाडल्या प्रकरणी त्यांना फाशी दिण्यात आली.

१९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १८७५)

१९६७: कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.

१९७४: अयुब खान, पाकिस्तानचा पंतप्रधान.

१९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.

१९९४: पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.

१९९८: उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९२८)

२००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

२००४: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.

२००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२०)

२००७: दूरदर्शन कार्टूनिस्ट मालिका द विजार्ड आफ़ आईडी चे व्यंगचित्रकार ब्रैंड पार्कर याचं निधन.

२००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९२२)

२०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *