२० एप्रिल दिनविशेष - 20 April in History
२० एप्रिल दिनविशेष - 20 April in History

हे पृष्ठ 20 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

२० मार्च दिनविशेष

On this page, we will list all historical events that occurred on 20th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६५७: न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.

१७१३: मुघल शासक जहांदार शाह दिल्लीच्या गाद्दीवर बसले.

१७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

१७७७: न्यूयार्कने ब्रिटन देशाकडून आपल्या स्वता:च्या स्वातंत्र्याची घोषणा करून एक स्वतंत्रित राज्याच्या रूपाने आपले नवीन संविधान स्वीकारले.

१९३९: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

१९४०: आरसीए द्वारा पहिला इलेक्ट्रोनिक्स माईक्रोस्कोप दाखवण्यात आला होता.

१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

१९९२: खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अ‍ॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.

१९९७: भारतीय क्रांतिकारक व राजनेता इंद्रकुमार गुजराल भारताचे १२ वे पंतप्रधान बनले.

२००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.

२०११: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या उपग्रह प्रक्षेपण वाहन ‘पीएसएलव्ही’  च्या साह्याने तीन उपग्रह यशस्वीपणे अवकाशात पाठवले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

हिटलर
हिटलर

५७०: मोहम्मद पैगंबर, इस्लाम धर्माचा संस्थापक.

७८८: आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्म

१७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.

१८०८: फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८७३)

१८७०: पाकिस्तानी विद्वान आणि भाषाशास्त्रज्ञ तसचं, उर्दू भाषेचे जनक मौलवी अब्दुल हक यांचा जन्मदिन.

१९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.

१८८९: साली जर्मन शासक व ‘राष्ट्रीय समजवादी जर्मन कामगार पक्ष’ नेता एडोल्फ हिटलर यांचा जन्मदिन.

१८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९६८)

१८९७: भारतीय वैदिक अभ्यासक, इंडोलॉजिस्ट पंडित सुधाकर चतुर्वेदी यांचा जन्मदिन.

१९१४: गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.

१९२०: पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय भजन गायिका ज्योतिका रॉय यांचा जन्मदिन.

१९२४: हिंदी साहित्याचे प्रसिद्ध समीक्षक आणि पीपल्स राइटर्स असोसिएशनचे संस्थापक व सरचिटणीस चंद्रबली सिंह यांचा जन्मदिन.

१९५०: एन. चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री.

१९६५: मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री व मेघालय राज्यातील विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते मुकुल एम. संगमा यांचा जन्मदिन.

१९६६: याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म.

१९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९१२: गॉथिक भयपट कादंबरी ड्रेकुलासाठी प्रख्यात असलेले आयरिश लेखक अब्राहम “ब्रैम” स्टोकर यांचे निधन.

१९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन. (जन्म: ६ जून १८५०)

१९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)

१९६०: सुप्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष.

१९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)

१९६८: सुप्रसिध्द भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य.

१९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)

२००२: राधाकृष्ण: एक जीवनी आणि जवाहरलाल: एक जीवानीचे लेखक व प्रसिद्ध भारतीय इतिहासकार सर्वपल्ली गोपाल यांचे निधन.

२००४: भारतीय पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय लोक कलाकार आणि शास्त्रीय गायक कोमल कोठारी यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *