२१ एप्रिल दिनविशेष - 21 April in History
२१ एप्रिल दिनविशेष - 21 April in History

हे पृष्ठ 21 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on the 21st of April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

भारतीय नागरी सेवा दिन National Civil Services Day

राष्ट्रीय नागरी सेवा दिन

National Civil Services Day

महत्त्वाच्या घटना:

७५३: रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)

१५२६: मुघल साम्राज्याचे शासक सम्राट अकबर व सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतचे पहिले युद्ध होऊन त्यांत सुलतान इब्राहिम लोदी यांच्या पराभवानंतर दिल्ली येथील सुलतान शाहीचा अंत झाला.

१६६९: छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची भेट घेतली.

१७२०: पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी बनले

१९३२: नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

१९४१: दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ग्रीस देश जर्मनी देशाला शरण गेला.

१९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.

१९७२: ’अपोलो १६’ या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.

 १९९६: भारतीय वायू सेनेचे अधिकारी संजय थापर पॅराशूट च्या साह्याने उत्तर ध्रुवावर उतरले.

१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय ७८ वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली. गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्‍या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनी ८१ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली होती.

२०००: आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्‍च न्यायालयाने निर्णय दिला.

२००७: वेस्ट इंडीज देशातील क्रिकेट संघाचे महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी एकदिवसीय क्रिकेट खेळातून निवृत्ती घेतली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६४: मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ जून १९२०)

१९०९: ज.द. गोंधळेकर (जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर), मराठी चित्रकार.

???? : उपेन्द्र भट – किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक

१९२२: अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७)

१९२६: एलिझाबेथ (दुसरी) – इंग्लंडची राणी. प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो.

१९३४: डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक

१९४५: भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.

१९५०: शिवाजी साटम – अभिनेते

१९५०: भारतातील प्राख्यात किराणा घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गायक पंडित उपेंद्र भट यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५०९: हेन्‍री (सातवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जानेवारी १४५७)

१९१०: मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५)

१९३८: कवी सर मुहम्मद इकबाल.

१९३८: सर मुहम्मद इक्‍बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

१९४६: जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ५ जून १८८३)

१९५२: सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (जन्म: २४ एप्रिल १८८९)

१९६४: द्रविड चळवळीला चालना देणारे महान भारतीय तमिळ कवी भारतीदासन यांचे निधन.

२०१३: शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

  1. महत्वाच्या घटना 1659 मध्ये शिवाजी महाराज यांचा उल्लेख आदराने छत्रपती शिवाजी महाराज असा करणे ही विनंती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *