हे पृष्ठ 14 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही 14 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 14th June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
जागतिक रक्तदाता दिन
महत्त्वाच्या घटना:
११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.
१७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
१७७५: अमेरिकन सैन्य दलाची स्थापना करण्यात आली.
१७७७: अमेरिकेने ’स्टार्स अँड स्ट्राइप्स’ या ध्वजाचा स्वीकार केला.
१७८९: मक्यापासुन पहिल्यांदाच ’व्हिस्की’ तयार करण्यात आली. तिला ’बोर्बोन’ असे नाव देण्यात आले कारण तयार करणारा रेव्हरंड क्रेग हा केंटुकी प्रांतातील ’बोर्बोन’ येथील रहिवासी होता.
१८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ’अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली. यातुनच पुढे कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. विद्यापीठ असे मोठमोठे उपक्रम सुरू झाले.
१९०१: पहिल्यांदा गोल्फ खेळाची प्रतियोगिता अमेरिकेत आयोजित करण्यात आली.
१९०७: नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१९२६: ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
१९३४: ऑस्ट्रिया देशाची राजधानी वियना येथे जर्मन शासक हिटलर आणि मुसोलिनी यांची भेट झाली.
१९३८: सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.
१९४०: जर्मनीने पॅरिस ताब्यात घेतल्यामुळे दोस्त राष्ट्रांनी तिथुन माघार घेतली.
१९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर
१९५२: अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
१९६२: पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.
१९६७: चीनने पहिल्या ’हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.
१९६७: मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.
१९७२: डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.
१९९९: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.
२००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१३९८: संत कबीर.
१४४४: भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म.
१७३६: चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६)
१८६४: अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (मृत्यू: १९ डिसेंबर १९१५)
१८६८: कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ जून १९४३)
१८९९: महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी ब्रिगेडियर राजिंदर सिंह यांचा जन्मदिन.
१९००: भारतीय निबंध लेखक आणि मल्याळम साहित्यांचे साहित्यिक समीक्षक कारिककट्ट मराठू कुट्टिकृष्ण मरार यांचा जन्मदिन.
१९१६: माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवान प्रेम चंद यांचा जन्मदिन.
१९२०: प्रख्यात जैन धर्मीय स्वेतंबर तेरापंथ आदेशाचे दहावे प्रमुख, संत, योगी, अध्यात्मिक नेते, तत्वज्ञ, लेखक, वक्ते आणि कवी आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा जन्मदिन.
१९२२: के. असिफ – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (मृत्यू: ९ मार्च १९७१)
१९४६: अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प(Donald Trump) यांचा जन्मदिन.
१९५५: सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका अभिनेत्री, गायक, मनोरंजन निर्माता, टीव्ही टॉक शो होस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या किरण अनुपम खेर यांचा जन्मदिन.
१९५९: लोकप्रिय भारतीय तेलगु भाषिक वक्ता व सनातन धर्मीय भाष्यकार चगंती कोटेश्वरा राव यांचा जन्मदिन.
१९६७: प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्मदिन.
१९६८: प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन राजकारणी तसचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन.
१९६९: साली प्रसिद्ध जर्मन माजी व्यावसायिक टेनिसपटू स्टेफनी मारिया(Stephanie Maria) यांचा जन्मदिन. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 22 ग्रँड स्लॅम एकेरीचे जेतेपद जिंकले आहे.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८२५: पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)
१९१६: गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
१९२०: मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (जन्म: २१ एप्रिल १८६४)
१९४६: जॉन लोगीबेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दुरचि त्रवाणी संशोधक.
१९६१: प्रसिद्ध भारतीय नोबल पारितोषिक वेजेते भौतिकशास्त्रज्ञ सी. वी. रमण यांचे शिष्य भौतिकशास्त्रज्ञ सर करिमानीक्कम श्रीनिवास कृष्णन यांचे निधन.
१९८९: सुहासिनी मुळगांवकर – अभिनेत्री व संस्कृत पंडित, मराठी रंगभूमीवरील एकपात्री नाट्यप्रयोगांची सुरुवात त्यांनी केली. ३१ जानेवारी १९६० रोजी ’सौभद्र’ नाटकाचा पहिला एकपात्री प्रयोग त्यांनी केला. या नाटकाचे त्यांनी विक्रमी ५०० प्रयोग केले. (जन्म: ????)
२००७: कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (जन्म: २१ डिसेंबर १९१८)
२०१०: मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (जन्म: १२ जुलै १९१३)
२०११: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रुद्र्विणा वादक भारतीय संगीतकार असद अली खान यांचे निधन.
२०२०: बॉलीवूड एक्टर सुशांत सिंग राजपुत यांच निधन.