२३ ऑगस्ट दिनविशेष - 23 August in History
२३ ऑगस्ट दिनविशेष - 23 August in History

हे पृष्ठ 23 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २३ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 23 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

कवी विंदा करंदीकर
कवी विंदा करंदीकर

१८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

१९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू

१९६६: ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.

१९९०: आर्मेनियाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

१९९१: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.

२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

२०११: लीबीयातील हुकुमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता उलथण्यात आली.

२०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार!

मलाईका अरोरा - खान
मलाईका अरोरा – खान

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७५४: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: २१ जानेवारी १७९३)

१८५२: भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१८)

१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९५७)

१८७५: भारतीय स्वतंत्रतासेनानी व चंपारण्य संग्रहाचे प्रमुख सदस्य राजकुमार शुक्ल यांचा जन्मदिन.

१८९०: न्यूज-डे चे सहसंस्थापक हॅरी फ्रँक गग्नेहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७१)

सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री
सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री

१९१८: गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार.

१९४४: सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री

१९५१: नूर – जॉर्डनची राणी

१९७३: मलाईका अरोरा – खान – मॉडेल व अभिनेत्री

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

आरती साहा
आरती साहा

६३४: अबू बकर – अरब खलिफा (जन्म: ? ? ५७३)

१३६३: डहाण राजवटीचे संस्थापक चेन ओंलियांग यांचे निधन.

१८०६: चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १७३६)

१८९२: ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८२७)

१९७१: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (जन्म: २४ जानेवारी १९२४)

१९७४: डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)

१९७५: पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते. १९३२ मध्ये त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. (जन्म: २२ जुलै १८९८)

१९९४: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)

१९९७: ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान एरिक गेयरी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९२२)

२००३: भारतीय कन्नड भाषिक लेखक ए. एन. मूर्ती राव यांचे निधन.

२०१३: आर.जे. कॉमन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक रिचर्ड जे. कॉर्मन यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९५५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *