२२ ऑगस्ट दिनविशेष - 22 August in History
२२ ऑगस्ट दिनविशेष - 22 August in History

हे पृष्ठ 22 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २२ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 22 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

चार्ल्स द गॉल
चार्ल्स द गॉल

१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

१८९४: महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांविरुद्धच्या भेदभावाविरुद्ध लढ्यासाठी नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली (संस्थापक चित्रीत).

१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना

१९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.

१९२१: महात्मा गांधी यांनी विदेशी वस्त्राची होळी पेटवली.

१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

१९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्‍होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

२०१८: भारतीय नेमबाज राही सरनोबत यांनी 25 मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून आशियाई खेळांच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३)

१७६०: पोप लिओ बारावा.

१८४८: शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९)

१८७७: पाश्चात्य भारतीय संस्कृतीचे प्रारंभिक भाषांतरकार,इतिहासकार आणि भारतीय कलेचे तत्त्वज्ञ आनंद केंटिश कुमारस्‍वामी यांचा जन्मदिन.

१८९३: अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.

पंडित गोपीकृष्ण
पंडित गोपीकृष्ण

१९०४: डेंग जियाओ पिंग – सुधारणावादी चिनी नेते (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

१९१५: शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (मृत्यू: १९ मे १९९७)

१९१५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २००७)

१९१८: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. (मृत्यू: १५ जुलै २००४)

१९१९: गिरीजाकुमार माथूर – साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक व कवी (मृत्यू: १० जानेवारी १९९४)

१९२०: डॉ. डेंटन कूली – ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद

१९२४: भारतीय आधुनिक हिंदी साहित्याचे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा जन्मदिन.

चिरंजीवी – अभिनेते व केंद्रीय मंत्री
चिरंजीवी – अभिनेते व केंद्रीय मंत्री

१९३५: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. १९५७ मध्ये त्यांनी ८२ दिवसांत ८७ कार्यक्रम करुन विक्रम केला. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)

१९५५: चिरंजीवी – भारतीय चित्रपट अभिनेते, राजकारणी व माजी भारतीय पर्यटन मंत्री

१९६४: मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१३५०: फिलिप (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ?? १२९३)

१६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.

१८१८: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (जन्म: ६ डिसेंबर १७३२)

१९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३)

१९७८: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० आक्टोबर १८९३)

किशोर साहू
किशोर साहू

१९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचे बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)

१९८०: मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९९)

१९८२: एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

१९८९: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता. (जन्म: २६ जुलै १८९३)

सूर्यकांत मांडरे
सूर्यकांत मांडरे

१९९५: पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ याजोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत. (जन्म: ? ? ????)

१९९९: सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३). त्यांच्या ’धाकटी पाती’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

२००१: शरद तळवलकर –आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)

२०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)

२०१८: गुरुदास कामत , भारतीय राजकीय नेते (जन्मतारीख: ५ ऑक्टोबर, १९५४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *