मुग्धा गोडसे
मुग्धा गोडसे

हे पृष्ठ 26 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २६ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 26 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन

महत्त्वाच्या घटना:

पॉली उम्रीगर

२००८ : अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.

२००५ : मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.

१९९९ : भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्‍या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड

१९९८ : १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान

१९९४ : सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर

विश्वनाथन आनंद

१९६५ : मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५६ : जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

१८९१ : फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.

१८४७ : लायबेरिया स्वतंत्र झाला.

१७४५ : इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.

१७८८ : न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अल्डस हक्सले

१९८५ : मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल

१९७१ : खलिद महमूद – बांगलादेशी क्रिकेटपटू

१९५५ : असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष

१९५४ : व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)

१८९४ : वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (मृत्यू: ३० मार्च १९६९)

१८९४ : अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

१८९३ : पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)

१८७५ : कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू: ६ जून १९६१)

१८५६ : जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

भास्कर चंदावरकर

२००९ : भास्कर चंदावरकर – संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६)

१८९१ : राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *