Contents
हे पृष्ठ 25 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २५ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 25 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:

२००७ : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी
१९९९ : लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
१९९७ : के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
१९९७ : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड

१९९४ : इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
१९९२ : स्पेनमधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९८४ : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.
१९७८ : जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
१९४३ : दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
१९१७ : कॅनडात आयकर लागू झाला.
१६४८ : आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२९ : सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
१९२२ : विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
१९१९ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)
१८७५ : जिम कॉर्बेट – ब्रिटिश – भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
१९७७ : कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: ? ? ????)
१८८० : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)