भाऊ दाजी लाड(रामकृष्ण विठ्ठल लाड), प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
भाऊ दाजी लाड(रामकृष्ण विठ्ठल लाड), प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.

हे पृष्ठ 7 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ७ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 7 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • वेद दिन
  • वायूसेना दिन (पाकिस्तान)

महत्त्वाच्या घटना:

बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया

२००५ : इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.

१९७९ : दिवाळखोरी टाळण्यासाठी ’ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

१९७८ : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

१९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९०६ : ’बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

१८२२ : ब्राझिलला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८१४ : दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने ’उंदेरी-खांदेरी’ किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

१६७९ : सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

सुनील गंगोपाध्याय
सुनील गंगोपाध्याय

१९४० : चंद्रकांत खोत – लेखक व संपदक

१९३४ : सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (मृत्यू: २३ आक्टोबर २०१२)

१९३४ : बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: २५ जुलै २०१२)

१९३३ : इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका, वकील व ’सेवा’ [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका

१९२५ : भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (मृत्यू: २४ डिसेंबर २००५)

१९१५ : डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५)

१९१२ : डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (मृत्यू: २६ मार्च १९९६)

१८४९ : बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, ग्वाल्हेर गायकीचा महाराष्ट्रात प्रचार केला (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७)

१८२२ : रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी, ग्रँट मेडिकल कॉलेजच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी (मृत्यू: ३१ मे १८७४)

१७९१ : उमाजी नाईक – पहिला क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७ : मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ११ आक्टोबर १९५१)

१९९४ : टेरेन्स यंग, चिनी – इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (जन्म: २० जून १९१५)

१९९१ : रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक (जन्म: ५ जून १९०८)

१९७९ : जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक(जन्म: ७ डिसेंबर १९०२)

१९५३ : भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ’फुलारी’ ऊर्फ ’बी. रघुनाथ’ – लेखक व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.