६ सप्टेंबर दिनविशेष - 6 September in History
६ सप्टेंबर दिनविशेष - 6 September in History

हे पृष्ठ 6 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ६ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on  6 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.

१८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

सरोदवादक अमजद अली खाँ
सरोदवादक अमजद अली खाँ

१९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केन्द्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

१९६५: पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ’ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली. या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.

१९६६: दक्षिण अफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हरवोअर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच भोसकुन हत्या.

१९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

१९९३: ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड

१९९७: अमेरिकेतील ’नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक अमजद अली खाँ यांची ’नॅशनल हेरिटेजफेलोशिप’साठी निवड

२००८: डी. सुब्बाराव यांची भारतीय रिजर्व बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ६ सप्टेबर पासून आपला पदभार सांभाळला.

२०१९: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वात पहिले ५० गाडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावे करणरे पहिले यष्टीरक्षक बनले.

२०१९: आपत्ती व्यवस्थापनेबद्दल आयोजित “IT एक्सिलेंस अवार्ड” ओडिसा राज्याने जिंकला.

बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी
बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७६६: जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ जुलै १८४४)

१८८९: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)

१८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.

यश जोहर
यश जोहर

१९०१: कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ’राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले व नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले. (मृत्यू: १८ मे १९९७)

१९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)

कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार.
कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार.

१९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.

१९२९: यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (मृत्यू: २६ जून २००४)

१९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.

१९६८: सईद अन्वर –पाकिस्तानी डावखुरा फलंदाज व कप्तान. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात तो दोन्ही डावांत शून्य धावांवर बाद झाला होता. आपल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याने केवळ ३ धावा केल्या होत्या. मात्र नंतर त्याची कामगिरी एकदमच बहारदार झाली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सलग तीन शतके झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो.

१९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९०७: नोबल पारितोषिक विजेता प्रख्यात फ्रेंच कवी आणि निबंधलेखक सुल्ली प्रुडहोमी(Sully Prudhomme) यांचे निधन.

राष्ट्रकवी गोविंद पै
राष्ट्रकवी गोविंद पै

१९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.

१९६३: मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी, त्यांना कन्‍नड, कोंकणी, इंग्लिश, तुळू, संस्कृत, तेलुगू, तामिळ, मराठी, कन्‍नड, बंगाली, पर्शियन, पाली, ऊर्दू, ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (जन्म: २३ मार्च १८८३)

अल्लाउद्दीन खाँ
अल्लाउद्दीन खाँ

१९७२: अल्लाउद्दीन खाँ – सरोदवादक व संगीतकार. हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार. सरोद, व्हायोलिन, बासरी व अन्य अनेक वाद्ये ते तयारीने वाजवत असत. मैहर राजघराण्याचे दरबारी वादक. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९५४), पद्मभूषण (१९५८), पद्मविभूषण (१९७१) इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. (जन्म: ? ? १८६२)

१९८६: सुरेश हरिप्रसाद जोशी – आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक. त्यांनी काही भारतीय व परकीय साहित्यकृतींचे गुजराथीत अनुवादही केले.
(जन्म: ३० मे १९२१)

१९९०: सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ जून १९१६)

२००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.

२००९: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे माजी तेरावे मुख्यमंत्री हरचरण सिंह ब्रार यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *