हे पृष्ठ 9 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 9 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
१७७६: अमेरीकेतोल कॉन्टिनेंटल कॉंग्रेसने “औपचारिकरित्या ‘सयुक्त वसाहती’ हे नाव बदलून “युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका” असे ठेवले.
१७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.
१८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र काचेच्या पट्टीवर घेतले.
१८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१ वे राज्य बनले.
१९२०: साली अलीगढ येथील एंग्लो ओरिएंटल महाविद्यालयाचे रुपांतर मुस्लिम विश्वविद्यालयात झाले.
१९३९: मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमामधे ’प्रभात’चा ’माणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म जर्नॅलिस्टस असोसिएशनने १९३९ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बहुमान त्याला दिला.
१९४५: दुसरे चीन जपान युद्ध – जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
१९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.
१९९१: ताजिकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९९७: सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्च असा ’ग्रँडमास्टर’ किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.
१९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला.
२००१: व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर दिग्दर्शित ’मॉन्सून वेडींग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ’गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला.
२००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी ’दुबई मेट्रो’चे उद्घाटन झाले.
२०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
२०१६: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८२८: लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)
१८५०: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात ’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)
१८७४: प्रसिद्ध भारतीय ओडिया भाषिक लेखक आणि भाषातज्ञ गोपालचंद्र प्रहराज यांचा जन्मदिन.
१८९०: कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ चे संस्थापक (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)
१९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)
१९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)
१९०७: साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसचं, सर्वोत्कृष्ट परराष्ट्रीय अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रणेते निर्माता-दिग्दर्शक मेहबूब खान यांचा जन्मदिन.
१९०९: लीला चिटणीस – अभिनेत्री (मृत्यू: १४ जुलै २००३)
१९१०: नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (मृत्यू: २६ मार्च १९९७)
१९३२: प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक रचनाकार कांती कुमार जैन यांचा जन्मदिन.
१९४१: अबीद अली – अष्टपैलू क्रिकेटपटू
१९५०: श्रीधर फडके – संगीतकार
१९६७: साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, मार्शल आर्टिस्ट अक्षय कुमार यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१४३८: एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (जन्म: ३१ आक्टोबर १३९१)
१९७६: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (जन्म: २६ डिसेंबर १८९३)
१९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)
१९४७: साली भारतातील सुविख्यात कलामर्मज्ञ तथा चिंतक आनंद कुमारस्वामी यांचे निधन.
१९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
१९६०: अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (जन्म: ६ एप्रिल १८९०)
१९९४: सत्यभामाबाई पंढरपूरकर – लावणीसम्राज्ञी (जन्म: ? ? ????)
१९९७: आर. एस. भट – ’युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे पहिले अध्यक्ष (जन्म: ? ? ????)
१९९९: पुरुषोत्तम दारव्हेकर – नाटककार व लेखक (जन्म: ? ? १९२७)
२००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या (जन्म: २ सप्टेंबर १९५३)
२०१०: वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (जन्म: ९ मे १९२८)
२०१२: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (२६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)