हे पृष्ठ 6 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ६ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 6 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.
१६७३: कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले.
१८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले.
१८३८: सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला.
१९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
१९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.
१९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता
१९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन
१९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
१९४६: आजच्या दिवशी विएतनाम येथे पहिल्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या.
१९८९: केहर सिंह आणि सतवंत सिंह यांना इंदिरा गांधींच्या हत्या करण्याच्या गुन्हात फाशीची शिक्षा देण्यात आली.
१९९४: सिडनी टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टीम ने ऑस्ट्रेलिया च्या टीम ला ५ रन नी हरविले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१४१२: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्या ’जोन ऑफ आर्क’चा जन्म. तिला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती ’द मेड ऑफ ऑर्लिन्स’ या टोपणनावानेही ओळखली जाते. (मृत्यू: ३० मे १४३१)
१७४५: बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.
१८१२: बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे ‘दर्पण’ हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ’दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू: १८ मे १८४६)
१८२२: उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म.
१८६८: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ‘दासगणू महाराज’ – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)
१८८३: खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू: १० एप्रिल १९३१)
१९१०: ला प्रसिद्ध भारतीय गायक जी. एन. बालासुब्रमनियम यांचा जन्म.
१९१८: ला भारतीय प्रसिद्ध गायक भारत व्यास यांचा जन्म.
१९२५: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (मृत्यू: १९ जून १९९८)
१९२८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)
१९३१: डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, ’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष
१९४०: प्रसिद्ध भारतीय लेखक नरेंद्र कोहली यांचा जन्म.
१९४९: परमवीर चक्राने सन्मानित सुभेदार बाना सिंग यांचा जन्म.
१९५५: रोवान अॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक
१९५९: कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेटकप्तान, समालोचक व प्रशिक्षक
१९६५: हिमाचल प्रदेश चे १४ वे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचा जन्म.
१९६७: ऑस्कर पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध गायक ए. आर. रेहमान यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७९६: जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी (जन्म: ? ? ????)
१८४७: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म: ४ मे १७६७)
१८५२: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९)
१८८४: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म: २० जुलै १८२२)
१८८५: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात ’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)
१९१८: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म: ३ मार्च १८४५)
१९१९: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २७ आक्टोबर १८५८)
१९७१: प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)
१९८१: ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म: १९ जुलै १८९६)
१९८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)
२००८: भारतीय ऑर्थोपेडिक सर्जन प्रमोद करन सेठी यांचे निधन.
२००९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद शाह यांचे निधन.
२०१०: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म: १६ जुलै १९४३)
२०१७: भारतीय अभिनेता ओम पुरी यांचे निधन.