दामू धोत्रे
दामू धोत्रे

हे पृष्ठ 31 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 31 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१९९७ : प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद हे पॅरिसमधे एका कार अपघातात ठार झाले.

१९९१ : किरगिझिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९७१ : अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.

१९७० : राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

व्ही. व्ही. गिरी
व्ही. व्ही. गिरी

१९९६ : पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९६२ : त्रिनिदाद व टोबॅगोला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५७ : मलेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४७ : भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.

१९२० : खिलाफत चळवळीची सुरूवात

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

जवगल श्रीनाथ
जवगल श्रीनाथ

१९६९ : जवगल श्रीनाथ – जलदगती गोलंदाज

१९४४ : क्लाईव्ह लॉईड – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू

१९४० : शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ’मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ’मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला आहे. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)

रॅमन मॅगसेसे
रॅमन मॅगसेसे

१९३१ : जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (मृत्यू: १० जुलै २००५)

१९१९ : अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ३१ आक्टोबर २००५)

१९०७ : रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ मार्च १९५७)

१९०२ : दामू धोत्रे – रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक (मृत्यू: ? ? ????)

१८७० : मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात. (मृत्यू: ६ मे १९५२)

काशीराम राणा
काशीराम राणा

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : काशीराम राणा – भाजपाचे लोकसभा सदस्य (जन्म: ७ एप्रिल १९३८)

१९९५ : ‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची चंडीगढ येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बोम्बस्फोटाद्वारे हत्या (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)

ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ
ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ

१९७३ : ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले. गुजरातेतील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिल्या भारतीय प्राचार्या होत्या. बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे. (जन्म: १९ एप्रिल १८९२)

१४२२ : हेन्‍री (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.