१८ सप्टेंबर दिनविशेष - 18 September in History
१८ सप्टेंबर दिनविशेष - 18 September in History

हे पृष्ठ 18 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १८ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 18 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

१. International Read An EBook Day
२. World Water Monitoring Day
३. World Bamboo Day

महत्त्वाच्या घटना:

१५०२: आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचला.

१८०८: प्रख्यात इंग्रजी साहित्यिक शेक्सपिअर यांचे रॉयल नामक थेटरची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आले.

१८१०: चिलीला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८५१: पुलित्झर पुरस्कार सन्मानित अमेरिकन वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्स चे प्रकाशन सुरु करण्यात आलं.

१८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.

१८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.

व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगूळकर

१९१९: हॉलंडमधे स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.

१९२४: गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

१९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना

१९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.

१९४७: अमेरिकन वायू दलाची स्थापना करण्यात आली.

१९४७: भारतीय राष्ट्रीय सुरक्षा कायदा पास करण्यात आला.

१९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.

१९६०: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले.

१९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९६७: साली भारतातील उत्तरपूर्व राज्य नागालँड ने इंग्रजी भाषेला आपली राजकीय आधिकारिक भाषा म्हणून घोषित केलं.

हृषिकेश मुकर्जी
हृषिकेश मुकर्जी

१९९७: महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना रामटेक नागपुर केली.

१९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर

२००२: चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्‍च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

२००९: टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

२०१४: स्कॉटलंड – युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्याच्या विरोधात ५५% ते ४५% मते दिली.

२०१६: सरकारविरोधी दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये १७ भारतीय लष्कराचे जवान ठार मारले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

५३: ट्राजान – रोमन सम्राट (मृत्यू: ९ ऑगस्ट ११७)

प्रभूलाल गर्ग
प्रभूलाल गर्ग

१७०९: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)

१८८३: इंग्लंडमध्ये शिकत असतांना ब्रिटीश अधिकारी विलियम कर्झन व्हायली यांची हत्या करणारे थोर भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी शहीद मदन लाल धिंग्रा यांचा जन्मदिन.

१८९५: जॉन डायफेनबेकर – कॅनडा देशाचे १३वे पंतप्रधान (निधन: १६ ऑगस्ट १९७९)

१८९५: ब्रिटीश कालीन भारतातील नवानगर राज्याचे महाराज व ब्रिटीश संघातील भारतीय कसोटी क्रीकेटपटू महाराजा रणजीत सिंह यांचा जन्मदिन.

१९००: शिवसागर रामगुलाम – मॉरिशस देशाचे पहिले मुख्यमंत्री, पंतप्रधान व गव्हर्नर जनरल (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)

१९०५: ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (मृत्यू: १५ एप्रिल १९९०)

१९०६: प्रभूलाल गर्ग ऊर्फ ‘काका हाथरसी’ – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. ’मेरा जीवन ए वन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले ’संगीत’ हे मासिक सुरू केले, ते आजतागायत चालू आहे. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)

१९१२: गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)

१९४५: मॅक्फि चे संस्थापक जॉन मॅक्फि यांचा जन्म.

१९५०: भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००९)

१९५०: पद्मश्री व राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी यांचा जन्मदिन.

१९५६: अनंत गाडगीळ – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार

१९५७: लॉईड मॉरिसन – एच. आर. एल. मॉरिसनचे संस्थापक (निधन: १० फेब्रुवारी २०१२)

१९६८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म.

१९७१: अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म.

१९८३: भारतीय दूरदर्शन मालिका कलाकार सनाया इरानी यांचा जन्मदिन.

१९८९: अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोन्नापा यांचा जन्मदिन.

२००४: नोदिरबेक अब्दुसत्तोरोव – उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

शिवाजी सावंत
शिवाजी सावंत

१७८३: लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (जन्म: १५ एप्रिल १७०७)

१८५९: भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य उठावातील अग्रगण्य क्रांतिकारी तात्या टोपे यांचे निधन.

१८९९: बंगाल नवजागृतीचे भारतीय लेखक आणि बौद्धिक राजनारायण बसु यांचे निधन.

१९५८: भारतरत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय थियोसोफिस्ट आणि सार्वजनिक व्यक्ती भगवान दास यांचे निधन.

१९९२: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ – २० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ – १६ डिसेंबर १९७०) (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)

१९९३: असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या (जन्म:

१९९५: प्रभूलाल गर्ग ऊर्फ ‘काका हाथरसी’ – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. ’मेरा जीवन ए वन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले ’संगीत’ हे मासिक सुरू केले, ते आजतागायत चालू आहे. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

१९९९: अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

असित सेन
असित सेन

२००२: शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ’मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ’मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

२००४: डॉ. भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक (जन्म: १३ मे १९२५)

२०१३: भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *