हे पृष्ठ 10 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 10 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच चौथा दिवस.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस (टेडी दिवस)
महत्त्वाच्या घटना:
१९२१: ड्यूक ऑफ़ कनॉट ने भारतातील इंडिया गेट चा पाया आजच्या दिवशी रचला.
१९२१: महात्मा गांधी यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली.
१९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
१९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
१९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
१९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
१९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना
१९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
१९७९: इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश ची राजधानी बनले.
१९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या “डीप ब्लू” या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
२००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
२००९: आजच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८४७: प्रसिद्ध लेखक नवीनचंद्र सेन यांचा जन्म.
१८०३: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ३१ जुलै १८६५)
१८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)
१९१०: दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२)
१९४२: भारतीय अभिनेत्री माधबी मुखर्जी यांचा जन्म.
१९४५: राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २०००)
१९७०: प्रसिद्ध भारतीय कवी कुमार विश्वास यांचा जन्म.
१९८५: प्रसिद्ध गायिका महाथी यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८६५: हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४))
१९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म: ५ एप्रिल १८२७)
१९२३: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५)
१९२२: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८२७)
१९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२)
१९९५: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार गुलशेर ख़ाँ शानी यांचे निधन.
२००१: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४)
२०१२: एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)