३१ जुलै दिनविशेष - 31 July in History

हे पृष्ठ 31 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३१ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 31 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.

१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.

१८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्टचर्चची स्थापना

१९३३: महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रम सोडला.

१९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला ’वहाँ’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईतील ’मिनर्व्हा’ टॉकीजमधे प्रदर्शित झाला.

१९४८: भारतात कलकत्ता शहरात प्रथम राज्य सेवा परिवहनाची स्थापना करण्यात आली.

रघुनाथ माशेलकर
रघुनाथ माशेलकर

१९५४: इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (मांऊंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.

१९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.

१९८२: सोवियत संघाने आण्विक चाचणी केली.

१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.

१९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

डॉ. डी. डी. भवाळकर
डॉ. डी. डी. भवाळकर

१९९२: भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT) डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार जाहीर

२००१: समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर

२००६: फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.

२०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७०४: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)

१८००: फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)

१८७२: लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)

१८८०: धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्‍या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (मृत्यू: ८ आक्टोबर १९३६)

मुमताज
मुमताज

१८८६: फ्रेड क्‍विम्बी – अमेरिकन अ‍ॅनिमेशनपट निर्माते (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)

१९०२: केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)

१९०७: दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (मृत्यू: २९ जून १९६६)

१९१२: मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)

जे. के. रोलिंग
जे. के. रोलिंग

१९१८: डॉ. श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (मृत्यू: १० एप्रिल २०००)

१९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)

१९४१: अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)

१९४७: मुमताज – अभिनेत्री

१९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २०१३)

१९६५: जे. के. रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका

१९९२: आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७५०: जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा (जन्म: २२ आक्टोबर १६८९)

१८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १७६५)

१८६५: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ, आधुनिक मुंबईचे शिल्पकार (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

१८७५: अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १८०८)

मोहम्मद रफी
मोहम्मद रफी

१९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

१९६८: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)

१९८०: मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)

२०११: रोमन कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू जोसेफ अल्बर्ट रोजारियो (Joseph Albert Rosario) यांचे निधन.

२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २३ जून १९४८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *