हे पृष्ठ 16 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 16 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
International Day for Tolerance
महत्त्वाच्या घटना:
१८२१: कनाडा या देशात नागरिकता कायदा आणखी कडक करण्यात आला होता.
१८२१: मेक्सिको या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती.
१८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता ’हेलिऑस’ वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
१८७०: ओकलाहोमा आजच्याच दिवशी अमेरिकेचे ४६ वे प्रांत बनले होते.
१८९३: डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन
१९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
१९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक ’फेडरल रिझर्व्ह’ सुरू झाली.
१९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
१९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
१९६५: वाल्ट डिस्नी वर्ल्ड ची पहिल्यांदा सार्वजनिक रित्या घोषणा करण्यात आली होती.
१९७५: पापुआ न्यू गिनी या देशाने ऑस्ट्रेलिया या देशापासून स्वातंत्र्य मिळविले होते.
१९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
१९९५: भारतीय वंशाचे वासुदेव पांडे त्रिनिनाद व टोबैगो या देशाचे आजच्याच दिवशी पंतप्रधान बनले होते.
१९९६: ’चतुरंग प्रतिष्ठान’च्या ’पर्सन ऑफ प्राईड’ पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड
१९९६: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ
१९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधी ल ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान
२०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘संस्कृत रचना पुरस्कार’ डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर
२००६: पाकिस्तान ने मध्यम अंतराच्या गोरी- व्ही क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले होते.
२००७: भीषण चक्रीवादळ ‘सीडर’ ने बंगालच्या खाडीतून उगम पावून बांगलादेशात भीषण अतोनात नुकसान केले होते.
२०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास ’भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
२०१४: इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने सिरीया येथील कुर्दिश योद्ध्यांच्या विरुध्द युद्धास सुरुवात केली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
४२: रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च ३७)
१८३६: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (मृत्यू: २० जानेवारी १८९१)
१८४६: उर्दूचे प्रसिध्द शायर अकबर इलाहाबादी यांचा जन्म झाला होता.
१८८०: ब्रिटीश लेखक , कवी तसेच नाटककार अल्फ्रेड नॉयस यांचा जन्म झाला होता.
१८९४: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)
१८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)
१९०४: नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९९६)
१९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)
१९१७: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)
१९२०: अमेरिका येथील प्रसिध्द व्यंगचित्रकार सैनमन यांचा जन्म झाला होता.
१९२२: पोर्तुगाल येथील प्रसिध्द नोबेल पुरस्कार विजेते लेखक जोसे सरामैगो यांचा जन्म झाला होता.
१९२२: विएतनाम या देशाचे राजनेते व प्रसिध्द राजनीतिज्ञ होंग मिन्ह चिन्ह यांचा जन्म झाला होता.
१९२७: डॉ. श्रीराम लागू – ’नटसम्राट’, ’हिमालयाची सावली’, ’किरवंत’ क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार
१९२८: डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान (मृत्यू: २९ जुलै २००६)
१९३०: मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय (मृत्यू: ११ जून १९९७)
१९३१: भारतीय क्रिकेट पंच आर रामचंद्र राव यांचा जन्म झाला होता.
१९६३: मिनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री
१९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०१४)
१९७३: पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८५७: पासी जातीची वीरांगना उदा देवी यांचा मृत्यू झाला होता.
१९१५: गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले. (जन्म: ? ? १८८८ – तळेगाव ढमढेरे, पुणे)
१९४७: व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७७)
१९५०: डॉ. बॉब स्मिथ – ’अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस’चे एक संस्थापक (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)
१९६०: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (१ फेब्रुवारी १९०१)
१९६७: रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (जन्म: १४ जुलै १९१७)
२००६: मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १९१२)
२०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.