भारतातील क्रांतिकारक चळवळी – India’s Revolutionary Movement
१ | सन १८९६ | प्लेग प्रकरणावरून चाफेकर बंधुंनी पुण्यात कमिश्नर रॅड व आयर्स्टचा यांचा खून केला. |
२ | सन १९०० | सावरकरांनी पुणे येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली. |
३ | सन १९०१ | नरेंद भट्टाचार्य यांनी कलकत्यात अनुशीलन समितीची स्थापना केली. |
४ | सन १९०४ | सावरकरांनी नाशिक येथे अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. |
५ | सन १९०५ | श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस नावाचे वसतिगृह सुरु केले. |
६ | सन १९०७ | बंगालमधील क्रांतिकारकांनी ले.गव्हर्नर फुल्लर यांच्या रेल्वेगाडीवर बॉम्ब फेकला. |
७ | सन १९०७ | अनंत कान्होरेने नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला. |
८ | ३० एप्रिल १९०८ | खुदिराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी कलेक्टर किंग्ज फोर्डवर बॉम्ब फेकला. |
९ | सन १९०९ | मदनलाल धिंग्राने कर्झेन वायलीचा गोळ्या घालून खून केला. |
१० | सन १९१० | नाशिक कटाबद्दल सावरकरांना पानन्स वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. |
११ | डिसेंबर १९१२ | अवधबिहारींनी दिल्लीत हार्डिंगच्या हत्तीवर बॉम्ब फेकला. |
१२ | सन १९११ | लाला हरदयाळ यांनी कॅलिफोर्नियामध्ये गदर पार्टीची स्थापना केली. |
१३ | सन १९२४ | सच्छिद्रनाथ सन्याल यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. |
१४ | ऑगस्ट १९२५ | चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काकोरी कट घडला. |
१५ | सन १९२८ | चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान सोशॉलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. |
१६ | ८ एप्रिल १९२९ | भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोन क्रांतिकारकांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब टाकला. |
१७ | सन १९२९ | लाहोर येथे दयानंद कॉलेजजवळ भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन क्रांतिकारकांनी स्टॅडर्सचा गोळया घालून खून केला. |
१८ | २३ मार्च १९२९ | लाहोर तुरुंगात भातसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन क्रांतीकारकांना फाशी व जतिनदास यांचे ५१ दिवसांच्या दीर्घ उपोषणानंतर निधन.
१९ |
१९ | १७ एप्रिल १९३० | सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चितगाव कटाची आखणी. यात महिलांचा सहभाग होता. |