हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

हे पृष्ठ 17 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 17 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking hey gopal krishna karu aarti teriexams.

जागतिक दिवस:

  • जागतिक अपस्मार जागरुकता दिन

महत्त्वाच्या घटना:

१९९६ : पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या ’नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून निवड

१९९४ : रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

१९९२ : देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची ’जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड

१९९२ : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर

१९३३ : अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

१९३२ : तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ’लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.

१८६९ : भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

१८३१ : ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

रत्‍नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते
रत्‍नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते

१९३८ : रत्‍नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते

१९३२ : शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री.  वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)

१९२५ : रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: २ आक्टोबर १९८५)

१७५५ : लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)

०००९ : व्हेस्पासियन – रोमन सम्राट (मृत्यू: २३ जून ००७९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी
’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी

२०१२ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (जन्म: २३ जानेवारी १९२६)

१९६१ : कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)

१९३५ : गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)

१९३१ : हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (जन्म: ६ डिसेंबर १८५३)

१९२८ : ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २८ जानेवारी १८६५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.