१ जून दिनविशेष - 1 June in History
१ जून दिनविशेष - 1 June in History

हे पृष्ठ 1 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 1st June. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१७९२: केंटुकी अमेरिकेचे १५वे राज्य बनले.

१७९६: टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.

१८३१: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.

१८७४: स्वातंत्र्य पूर्व भारतातील ब्रिटीश सरकारची इस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली.

१९२९: प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.

१९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

१९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना

१९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.

१९६१: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.

१९९२: भारत व इजराईल या दोन देशांतर्गत हवाई मार्गाबाबत करार करण्यात आला.

१९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.

२००१: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.

२००३: चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.

२००४: रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.

२००७: साली ब्रिटन देशांत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली.

२०१४: नायजेरिया देशांतील फुटबॉल खेळाच्या मैदानात झालेल्या बॉम्बस्फोटा मध्ये ४० लोकांचा मृत्यू झाला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

मॉर्गन फ्रीमन, अमेरिकन अभिनेता.
मॉर्गन फ्रीमन, अमेरिकन अभिनेता.

१८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)

१८४३: फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९३०)

१८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)

१९०७: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९९६)

१९२६: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)

नर्गिस दत्त, भारतीय अभिनेत्री.
नर्गिस दत्त, भारतीय अभिनेत्री.

१९२९: नर्गिस दत्त, भारतीय अभिनेत्री.

१९३७: मॉर्गन फ्रीमन, अमेरिकन अभिनेता.

१९३८: प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी व लेखक बलदेव वंशी यांचा जन्मदिन.

१९४७: मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म.

आर. माधवन, हिंदी चित्रपट अभिनेता
आर. माधवन, हिंदी चित्रपट अभिनेता

१९६५: इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट यांचा जन्म.

१९७०: आर. माधवन, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९७५: भारतीय सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार तसचं, पद्मश्री पुरस्कार सन्मानित पहिल्या भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भार्तोलन खेळाडू कर्णम मल्लेश्वरी यांचा जन्मदिन.

१९८५: भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म.

१९९१: भारतीय युवा महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड यांचा जन्मदिन.

नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८३०: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १७८१)

१८६८: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १७९१)

१८७२: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १७९५)

१९३४: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.

१९४४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६७)

१९६०: जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९६)

१९६२: दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.

१९६८: अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन. (जन्म: २७ जून १८८०)

१९८४: हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.

१९८७: दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१४)

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक

१९९६: नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.

१९९८: गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक.

१९९९: होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९१०)

२०००: एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.

२००१: नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या. (जन्म: २८ डिसेंबर १९४५)

२००२: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)

२००६: लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *