९ ऑगस्ट दिनविशेष - 9 August in History
९ ऑगस्ट दिनविशेष - 9 August in History

हे पृष्ठ 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ९ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 9 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

भारत छोडो दिवस
भारत छोडो दिवस
  • आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन
  • भारतीय ग्रंथालय दिन
  • ऑगस्ट क्रांती दिवस (भारत)
  • भारत छोडो दिवस (भारत)
  • राष्ट्र दिवस (सिंगापुर)
  • राष्ट्रीय महिला दिवस (दक्षिण आफ्रिका)

महत्त्वाच्या घटना:

११७३: पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.

१८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.

डॉ. अनिल काकोडकर
डॉ. अनिल काकोडकर

१९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.

१९४२: ’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

१९४५: अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.

१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.

१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.

१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन

१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.

१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन

१९९६: पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार तसचं, भारतरत्न पुरस्कार सन्मानित जगप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी नियुक्ती करण्यात आली.

२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर

२००५: अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे डिस्कव्हरी हे मानवरहित अंतराळ यान चौदा दिवसांच्या साहसी आणि धोकादायक प्रवासानंतर कॅलिफोर्नियास्थित एअरबेसवर सुरक्षितपणे उतरले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६३१: इंग्लंड देशांतील पहिले कवी पुरस्कार विजेते इंग्रज कवी, साहित्यिक समीक्षक, अनुवादक आणि नाटककार जॉन ड्राइडन (John Dryden) यांचा जन्मदिन.

डॉ. विनायक कृष्ण गोकाक
डॉ. विनायक कृष्ण गोकाक

१७५४: पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू: १४ जून १८२५)

१७७६: अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६)

१८७६: ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय (Robert Bulwer-Lytton, 2nd) यांचा जन्मदिन.

१८९०: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. ’हाच मुलाचा बाप’, ’सन्याशाच्या मुलगा’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे ’सौभद्र’, ’शारदा’, ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ इ. अनेक नाटके रंगभूमीवर आली. (मृत्यू: ४ आक्टोबर १९२१)

१८९१: सयुक्त प्रांताचे माजी राज्यपाल फ्रान्सिस वर्नर वाईली (Francis Verner Wylie) यांचा जन्मदिन.

१८९३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी कादंबरीकार, संपादक आणि गद्य लेखक शिवपूजन सहाय यांचा जन्मदिन.

१९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)

’संगीतसूर्य’ केशवराव भोसले
’संगीतसूर्य’ केशवराव भोसले

१९२०: कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ? ? ????)

१९३३: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक व कादंबरीकार मनोहर श्याम जोशी यांचा जन्मदिन.

१९३७: मॉरिशस येथील पसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार अभिमन्यू अनंत यांचा जन्मदिन.

१९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म.

१९९१: हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

११७: ट्राजान – रोमन सम्राट (जन्म: १८ सप्टेंबर ५३)

११०७: जपानी सम्राट होरिकावा यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)

१९०१: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ? ? १८१९)

१९४८: हुगो बॉस कानी चे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८८५)

१९६२: नोबल पारितोषिक पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध जर्मन स्विस कवी, कादंबरीकार आणि चित्रकार हर्मन कार्ल हेसे (Hermann Hesse) यांचे निधन.

१९७०: ब्रिटीश कालीन भारतात तीस वर्ष तुरुंगवास भोगणारे प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते व राजकारणी त्रिलोकनाथ चक्रवर्ती यांचे निधन.

१९७६: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)

१९९६: जेट इंजिन चे शोधक फ्रॅंक व्हाटलेट यांचे निधन. (जन्म: १ जुन १९०७)

२००२: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म: १ जानेवारी १९१८)

२०१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *