व्ही. व्ही. गिरी

हे पृष्ठ 10 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 10 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

आंतरराष्ट्रीय बायो डिझेल दिन (International Biodiesel Day)

महत्त्वाच्या घटना:

१६७५: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.

१८१०: ’स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन’ ची स्थापना झाली.

१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.

१९८८: दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.

१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.

१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय. सामिष

१९९९: ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

देवांग मेहता
देवांग मेहता

१७५५: नारायणराव पेशवा – ५ वा पेशवा (मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३)

१८५५: ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (मृत्यू: १६ मार्च १९४६)

१८६०: पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)

१८७४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २० आक्टोबर १९६४)

१८९४: व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: २३ जून १९८०)

१९०२: नॉर्मा शिअरर – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: १२ जून १९८३)

१९१३: डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान (मृत्यू: ८ मे २००३)

१९६०: देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष (मृत्यू: १२ जुलै २००१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९४२: हुतात्मा शिरीषकुमार (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

१९५०: खेमचंद प्रकाश – संगीतकार (जन्म: १२ डिसेंबर १९०७)

१९८०: जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)

१९८२: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (जन्म: १० एप्रिल १९२७)

१९८६: जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती. (जन्म: २७ जानेवारी १९२६)

१९९२: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६)

१९९७: नारायण पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक (जन्म: ? ? ????)

२०१२: सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (जन्म: ११ आक्टोबर १९३२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *