११ ऑगस्ट दिनविशेष - 11 August in History
११ ऑगस्ट दिनविशेष - 11 August in History

हे पृष्ठ 11 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ११ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 11 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

इ.स.पू. ३११४: मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर – सुरु झाले.

१८७७: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.

सी. डी. देशमुख
सी. डी. देशमुख

१९४३: सी. डी. देशमुख हे ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया’चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

१९५२: हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.

१९६०: चाडला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६१: दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

१९७९: गुजरातेतील मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

१९८७: ’युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह’च्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.

१९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना ’विश्वगुर्जरी पुरस्कार’ जाहीर

१९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.

डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी
डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी

१९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा आजवरचा तो सर्वात छोटा खेळाडू आहे.

२००३: नाटो (NATO) – अफगाणिस्तानमधील शांती सैन्याची कमान हाती घेतली, ते नाटोचे ५४ वर्षांच्या इतिहासात युरोपबाहेरील पहिले मोठे ऑपरेशन आहे.

२०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७७८: जर्मन व्यायामशाळेचे शिक्षक आणि राष्ट्रवादी फ्रेडरिक लुडविग जॉन यांचा जन्मदिन.

रामाश्रेय झा – संगीतकार,
रामाश्रेय झा – संगीतकार,

१८९७: एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)

१९११: प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (मृत्यू: ८ मे १९९५)

१९२८: रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (मृत्यू: १ जानेवारी २००९)

१९२८: विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)

१९४३: जनरल परवेझ मुशर्रफ – पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष

१९४४: फेडएक्स कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रेडरिक स्मिथ(Frederick W. Smith) यांचा जन्मदिन.

१९४९: भारतीय अर्थशास्त्रज्ञ, सेंट्रल बँकर आणि निवृत्त आयएएस अधिकारी तसचं, भारतीय रिझर्व्ह बँकचे माजी 22 वे गव्हर्नर दुव्वरी सुब्बाराव यांचा जन्मदिन.

१९५४: यशपाल शर्मा – क्रिकेटपटू

१९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म.

१९५०: ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांचा जन्म.

१९७४: अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्णधार अंजू जैन यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

खुदिराम बोस
खुदिराम बोस

१९०८: खुदिराम बोस – क्रांतिकारक (जन्म: ३ डिसेंबर १८८९)

१९७०: इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (जन्म: १५ डिसेंबर १९०५)

१९९९: रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (जन्म: ३१ आक्टोबर १९४६)

२०००: पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)

२००३: अर्मांड बोरेल – स्विस गणितज्ञ (जन्म: २१ मे १९२३)

२०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९२०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *