२० ऑक्टोबर दिनविशेष - 20 October in History
२० ऑक्टोबर दिनविशेष - 20 October in History

हे पृष्ठ 20 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 20 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • लोकशक्ती दिन
  • जागतिक अस्थिसुषिरता (Osteoporosis) दिन

महत्त्वाच्या घटना:

१५६८: साली मुघल शासक अकबर यांनी चित्तोडगढ वर हल्ला केला.

१७७४: साली कोलकाता(तत्कालीन कलकत्ता)  ही भारताची राजधानी बनली होती.

१८२२: साली ब्रिटीश वर्तमानपत्र ‘लंडन संडे टाईम्स‘ चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता.

१९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.

१९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९६२: चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.

१९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना

१९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर

१९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.

१९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.

डॉ. नॉर्मन बोरलॉग
डॉ. नॉर्मन बोरलॉग

१९५०: कृ. भा. बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.

१९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

१९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

१९९५: ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर

२००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर

२०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८५५: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)

१८९१: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २४ जुलै १९७४)

नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार

१८९३: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)

१९१६: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)

१९२०: साली भारतीय कायदेपंडित, मुत्सद्दी आणि पश्चिम बंगालमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री, पंजाब राज्याचे माजी राज्यपाल व अमेरिकेचे भारतीय राजदूत अशी अष्टपैलू कामगिरी सांभाळणारे सिद्धार्थ शंकर राय यांचा जन्मदिन.

वीरेन्द्र सहवाग
वीरेन्द्र सहवाग

१९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)

१९३०: साली भारताची राजधानी दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचा जन्मदिन.

१९६३: नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार

१९७८: वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८९०: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म: १९ मार्च १८२१)

१९८२: भारतीय वरिष्ठ नागरी सेवक अधिकारी तसचं,  केरळ आणि मध्य प्रदेश राज्यांचे राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचे निधन.

१९६१: व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली. (जन्म: ? ? ????)

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर
कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर

१९६४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १० ऑगस्ट १८७४)

१९७४: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (जन्म: २० जानेवारी १८९८)

१९८४: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)

१९९६: दि. वि. तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)

१९९९: माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: ? ? १९१५)

२००९: वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म: ४ मे १९२९)

२०१०: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म: ५ जानेवारी १९४८)

२०११: मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म: ७ जून १९४२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *