बॉबी देओल
बॉबी देओल

हे पृष्ठ 27 रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २७ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 27 Janaury. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

बालभारती
बालभारती

१८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे ‘द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी’ची स्थापना
१९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.
१९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या ’रेड आर्मी’ने पोलंडमधील ’ऑस्विच’ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.

१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.
१९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अजित खान ऊर्फ ’अजित’
अजित खान ऊर्फ ’अजित’
जनरल अरुणकुमार वैद्य
जनरल अरुणकुमार वैद्य

१७५६: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (मृत्यू: ५ डिसेंबर १७९१)
१८५०: एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू: १५ एप्रिल १९१२)
१९०१: लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्‍गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ’तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली. (मृत्यू: २७ मे १९९४)

१९२२: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक (मृत्यू: २२ आक्टोबर १९९८)
१९२६: जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)
१९६७: बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

आर. वेंकटरमण
आर. वेंकटरमण

१९४७: पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म: १९ एप्रिल १८६८)

निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक
निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक

१९६८: सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म: २६ मे १९०२)
१९८६: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म: १४ आक्टोबर १९३१)
२००७: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म: ६ डिसेंबर १९३२)
२००८: सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ जून १९२१)
२००९: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *