२६ जानेवारी दिनविशेष - 26 January in History
२६ जानेवारी दिनविशेष - 26 January in History

हे पृष्ठ 26 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २६ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 26 January. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

भारतीय प्रजासत्ताक दिन - भारत.

भारतीय प्रजासत्ताक दिन – भारत.

ऑस्ट्रेलिया दिन – ऑस्ट्रेलिया.

मुक्ति दिन – युगांडा.

महत्त्वाच्या घटना:

उषा मेहता
उषा मेहता

१५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.

१६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया

१८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.

१८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.

१९२४: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.

एच. जे. कनिया
एच. जे. कनिया

१९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली. स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड झाली. पुढे प्रत्यक्षात १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजासत्ताक राज्यपध्दती स्वीकारली जाऊन तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होऊ लागला.

१९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन

१९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.

१९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू

१९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना ’पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान

२००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

शिवलाल यादव
शिवलाल यादव
अकिओ मोरिटा
अकिओ मोरिटा

१८९१: ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्‍हे – बडोद्याचे राजकवी, ’गोदागौरव’ आणि ’कविता रति’ ही त्यांची विशेष गाललेली काव्ये आहेत. (मृत्यू: १७ मार्च १९३७)

१९२१: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (मृत्यू: ३ आक्टोबर १९९९)

१९२५: पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (मृत्यू: २६ सप्टेंबर २००८)

१९५७: शिवलाल यादव – क्रिकेटपटू

मानवेंद्रनाथ रॉय
मानवेंद्रनाथ रॉय

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७३०: कवी श्रीधर यांनी समाधि घेतली (जन्म: ? ? ????)१)

१८२३: एडवर्ड जेन्‍नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर (जन्म: १७ मे १७४९)

रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण
रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण

१९५४: मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (जन्म: २१ मार्च १८८७)

१९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा ‘बापूजी’ अणे (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)

२०१५: रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (जन्म: २४ आक्टोबर १९२१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *