२४ ऑक्टोबर दिनविशेष - 24 October in History
२४ ऑक्टोबर दिनविशेष - 24 October in History

हे पृष्ठ 24 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 24 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

World Development of Information Day

जागतिक माहिती विकास दिन : World Development of Information Day

  • जागतिक पोलिओ निर्मूलन दिन

महत्त्वाच्या घटना:

१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.

१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.

१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.

१९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.

१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.

१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.

१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.

१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.

१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.

१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.

१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.

१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.

१६०५: मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.

१८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.

१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.

१९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.

१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.

१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

१९४६: अमेरिकेने पाठवलेल्या रॉकेटच्या साह्याने अवकाशातून पुर्थ्वीचे छायाचित्र काढण्यात आले.

१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.

१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

१९६४: उत्तर र्‍होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.

१९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.

१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.

१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

बाबा आमटे
बाबा आमटे

२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. ६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.

२००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.

२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.

१९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.

१८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.

१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)

१६३२: अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)

१७७५: बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)

१८६८: भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)

१८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)

१९१०: ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री (मृत्यू: ? ? ????)

१९११: भारतीय स्वातंत्र्यसैनिक व प्रमुख समाजवादी नेता, अशोक मेहता यांचा जन्मदिन.

रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण
रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण

१९१४: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (मृत्यू: २३ जुलै २०१२)

१९२१: रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)

१९२६: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (मृत्यू: ३ आक्टोबर २०१२)

१९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.

१९७२: रीमा लांबा ऊर्फ ’मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

१९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)

१९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१६७५: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १६२१)

१६०१: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)

१९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)

१९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)

१९५४: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि समाजवादी राजकारणी रफी अहमद किदवई यांचे निधन.

१९७९: अबारथ कंपनी चे संस्थापक कार्लो अबारट यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९०८)

१९९१: इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (जन्म: १५ ऑगस्ट १९१५)

प्रबोधचंद्र तथा मन्ना डे
प्रबोधचंद्र तथा मन्ना डे

१९९२: अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)

१९९५: माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)

२०११: लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९२७)

२०१३: प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक. ’सीमा’, ’बरसात कीरात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती. (जन्म: १ मे १९१९)

२०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.

२०१७: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बनारस घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *