२५ ऑक्टोबर दिनविशेष - 25 October in History
२५ ऑक्टोबर दिनविशेष - 25 October in History

हे पृष्ठ 25 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 25 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.

१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.

१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जे. एम. कोएत्झी
जे. एम. कोएत्झी

१९९५: भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी सयुक्त राष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणार्थ सभेला संबोधित केलं.

१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.

२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.

१८००: ब्रिटीश राजनीतिज्ञ, कवी, इतिहासकार, निबंधकार व समीक्षक थॉमस बॅबिंग्टन मैकाले (Thomas Babington Macaulay) यांचा जन्मदिन.

१८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०)

१८८१: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

१८८३: भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण सर्वेक्षणात काम करणारे पहिले भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ दाराशॉ नोशेरवान वाडिया यांचा जन्मदिन.

१९१२: संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक मदुराई मनी अय्यर यांचा जन्मदिन.

१९२९: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी २५वे सरन्यायाधीश मानेपल्ली नारायणराव वेंकटाचलिया यांचा जन्मदिन.

१९३७: डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ३० जुलै २०११)

अपर्णा सेन – अभिनेत्री
अपर्णा सेन – अभिनेत्री

१९३८: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखिका मृदुला गर्ग यांचा जन्मदिन.

१९४५: अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका

१९८७: उत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज उमेश यादव यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी
अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी

१६४७: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म: १५ आक्टोबर १६०८)

१९५५: पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत. (जन्म: २८ मे १९२१)

चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते
चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते

१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

१९८०: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१)

१९९०: भारतीय राज्य मेघालय राज्याचे संस्थापक व पहिले मुख्यमंत्री तसचं, मिझोरम राज्याचे पहिले राज्यपाल विलियम सन संगमा यांचे निधन.

२००३: पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदिशास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: १९ आक्टोबर १९२०)

जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते
जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते

२००५: ज्ञानपीठ पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कादंबरीकार, कार्यकर्ते आणि अनुवादक व साहित्यकार निर्मल वर्मा यांचे निधन.

२००९: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३)

२०१२: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म: ३ मार्च १९५५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *