२६ ऑक्टोबर दिनविशेष - 26 October in History
२६ ऑक्टोबर दिनविशेष - 26 October in History

हे पृष्ठ 26 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 26 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१७७४: फिलाडेल्फिया येथे अमेरिकेतील पहिली महाद्विपीय कॉंग्रेस स्थगित झाली होती.

१८५८: एच. इ. स्मिथ यांनी वाशिंग मशीन चा पेटेंट घेतलं.

१८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.

१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

१९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.

१९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.

१९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.

व्ही. व्ही. रानडे
व्ही. व्ही. रानडे

१९६२: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

१९७६: त्रिनिदाद व टोबॅगो देशांना लंडन कडून स्वातंत्र्य मिळालं.

१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर

२००६: महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१२७०: संत नामदेव (मृत्यू: ३ जुलै १३५०)

१८८१: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक, कायदेपंडित व राजकीय नेते बीरेंद्रनाथ ससमल यांचा जन्मदिन.

१८८६: ओडिसा राज्यातील उल्लेखनीय समाजवादी व कवी पंडित गोदाबरीश मिश्रा यांचा जन्मदिन.

१८८८: प्रसिद्ध बंगाली लेखक व साहित्यक समीक्षक मोहितलाल मजुमदार यांचा जन्मदिन.

१८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)

हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक
हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक

१८९१: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ आक्टोबर १९६४)

१९००: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३)

१९१६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)

१९१९: मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८०)

१९२४: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्ता व गांधीवादी शोभना रानडे यांचा जन्मदिन.

रवीना टंडन
रवीना टंडन

१९३७: हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक

१९४७: हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री

१९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)

१९७४: रवीना टंडन – अभिनेत्री

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

डॉ. वाल्डेमर हाफकिन
डॉ. वाल्डेमर हाफकिन

१९०९: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१)

१९३०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६०)

१९४७: ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय यांचे निधन.

१९५५: हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांचे निधन.

१९७९: चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली. (जन्म: ? ? ????)

अनंत काशिनाथ भालेराव
अनंत काशिनाथ भालेराव

१९८१: भारतीय पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कन्नड भाषिक कवी दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे निधन.

१९९१: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)

२०००: भारतीय स्वतंत्रता संग्रामातील प्रमुख क्रांतिकारक व सिद्धहस्त लेखक तसचं, हिंदी, इंग्रजी व बांग्ला बाषिक आत्मकथाकारसाहित्यिक मन्मथनाथ गुप्ता यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *