१४ जानेवारी दिनविशेष - 14 January in History
१४ जानेवारी दिनविशेष - 14 January in History

हे पृष्ठ 14 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १४ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 14 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

मकर संक्रमण

मकर संक्रमण

महत्त्वाच्या घटना:

एम.एस. सुब्बलक्ष्मी
एम.एस. सुब्बलक्ष्मी

१७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

१९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

१९४८: ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.

मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे
मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे

१९९४: मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.

१९९८: दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.

२०००: ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५५१: अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक अबुल फ़ज़ल यांचा जन्म.

रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे
रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे

१८८२: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (मृत्यू: १४ आक्टोबर १९५३)

१८८३: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०)

दुर्गा खोटे
दुर्गा खोट

१८९२: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३)

१८९६: ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख (मृत्यू: २ आक्टोबर १९८२)

सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी
सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी

१९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)

१९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.

१९१८: भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक सुधाताई जोशी याचा जन्म.

१९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार (मृत्यू: १० मे २००२)

१९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २००९)

१९२६: महाश्वेता देवी – बंगाली लेखिका

नारायण कार्तिकेयन
नारायण कार्तिकेयन

१९३१: सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)

१९७७: नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर

१९८२: माजी प्रधान मंत्री इंदिरा गांधींनी २ सूत्री कार्यक्रमाची घोषणा.

१९९२: माजी भारतीय क्रिकेटर दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार
चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार

१७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)

१७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)

१७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२)

१८९८: इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.

१९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)

१९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)

२००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते (जन्म: ? ? ????)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *