१३ जानेवारी दिनविशेष - 13 January in History
१३ जानेवारी दिनविशेष - 13 January in History

हे पृष्ठ 13 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १३ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 13 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

गोविन्द बल्लाळ देवल
गोविन्द बल्लाळ देवल

१८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

१८९९: गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

१९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

१९१०: न्यूयार्क मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक रेडीओ च्या माध्यमातून प्रसारण.

के. जी. बालकृष्णन
के. जी. बालकृष्णन

१९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

१९४८: १२ जानेवारीच्या संध्याकाळी महात्मा गांधींनी हिंदू मुस्लीम एकतेसाठी उपोषणाला बसण्याचे घोषित केले आणि आजच्या दिवशी ते उपोषणाला बसले.

१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी

१९५७: हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

१९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार

श्री. चिंतामणराव देशमुख
श्री. चिंतामणराव देशमुख

१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.

१९७८: अमेरिकेने पहिल्यांदा महिला अंतरिक्षयात्री निवडली.

१९९६: पुणे – मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.

२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला नॅशनल कांफ्रेंस चे अध्यक्ष बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

राकेश शर्मा
राकेश शर्मा

१९१९: एम. चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ – १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ – १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ – १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ – १९९६) (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)

१९२६: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९)

१९३८: पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार

इम्रान खान
इम्रान खान

१९४९: राकेश शर्मा – एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर

१९७८: भारतीय अभिनेता अस्मित पटेल यांचा जन्म.

१९८२: कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९८३: इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

प्रभाकर पणशीकर
प्रभाकर पणशीकर

१८३२: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)

१९७६: अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: ? ? १८९२?)

१९८५: मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९१५)

१९९७: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२)

मल्हार सदाशिव
मल्हार सदाशिव

१९९८: शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

२००१: श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक. कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे ’शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत. (जन्म: ? ? ????)

२०११: प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (जन्म: १४ मार्च १९३१)

२०१३: रुसी सुरती – क्रिकेटपटू (जन्म: २५ मे १९३६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *