हे पृष्ठ 9 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 9th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- गोव्यामध्ये हा दिवस ’जागतिक कोंकणी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
१६६९: मुघल शासक औरंगजेब यांनी आपल्या सैनिकांना हिंदुची सर्व धार्मिक स्थळे, मंदिर, शाळा उध्वस्त करण्यास सांगितले.
१८६०: फ्रेंच देशातील प्रकाशक, पुस्तक विक्रेता आणि शोधक एडुअर्ड-लिओन स्कॉट डी मार्टिनविले यांनी सर्वप्रथम मानवी आवाजाचे ध्वनीमुद्रण केलं.
१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत ’एक’ मताने मंजुरी मिळाली.
१९४०: दुसरे महायुद्ध : जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१९५३: वॉर्नर बंधूंचा पहिला त्रिमितीय (3 D) चित्रपट, हाऊस ऑफ वॅक्स, प्रदर्शित झाला.
१९६७: बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.
१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ’आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
१९९५: लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ’अवधरत्न’ व साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
२००३: इराक देशातील लोकांना सद्दाम हुसेन यांच्या तानशाही पासून मुक्ती मिळाली.
२००५: प्रिन्स चार्ल्सचा कॅमिला पार्कर-बोल्सशी विवाह संपन्न.
२०११: प्रख्यात भारतीय समाजसेवक अण्णा हजारे दिल्ली येथे लोकपाल बील कायदा पास करण्यासठी करीत असलेले आमरण उपोषण सरकारने आपली मागणी मान्य केल्यानंतर बंद केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१३३६: तैमूरलंग – मंगोल सरदार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
१७७०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.
१८२८: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (मृत्यू: २५ जुलै १८८०)
१८८७: विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ आक्टोबर १९५०)
१८९३: राहूल सांकृतायन – इतिहासकार (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
१९२५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (मृत्यू: २१ आक्टोबर १९९५)
१९२९: भारतीय पद्मभूषण, पद्मश्री, संगीत-नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित शरण राणी यांचा जन्मदिन.
१९३०: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म.
१९४८: जया भादुरी – अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
५८५: ५८५ इ.स. पूर्व : जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पूर्व ७११)
१६२६: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (जन्म: २२ जानेवारी १५६१)
१६९५: [वैशाख शु. ६ शके १६१७] पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली. भर्तृहरीच्या शतकत्रयीचा अनुवाद आणि यथार्थदीपिका ही गीतेवरील टीका हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. (जन्म: ? ? १६०७)
१९०१: भारतीय रहस्यवादी, तत्वज्ञ, विद्वान, सुधारक व जैन कवी श्रीमद श्रीरामचंद्र यांनी समाधी घेतली.
१९५२: प्रख्यात काश्मीर खोऱ्यातील कवी महजूर यांचे निधन.
१९८१: भारतीय स्वातंत्र्य सेनानी दुर्गाबाई देशमुख यांचे निधन.
१९९४: चंद्र राजेश्वर राव – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (जन्म: ? ? १९१४)
१९९८: डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: २२ जून १९०८)
२००१: बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ’आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक (जन्म: ११ आक्टोबर १९३०)
२००१: शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ११ जुलै १९२१)
२००९: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (जन्म: १३ जानेवारी १९२६)
२००९: अशोकजी परांजपे – गीतकार (जन्म: ? ? ????)