हे पृष्ठ 22-june रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 22 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 22nd June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • फाशीवाद विरोधी आंदोलन दिन: क्रोएशिया.
  • शिक्षक दिन: एल साल्वादोर.

महत्त्वाच्या घटना:

१६३३: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

१७५७: प्लासीची लढाई सुरू झाली.

दामोदर हरी चाफेकर
दामोदर हरी चाफेकर

१८९७: चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.

१९०८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण.

१९०८: ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा

१९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे ‘हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.

लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.
देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा

१९३३: विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

१९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.

१९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.

१९७६: कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.

१९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.

१९७८: जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

१९८४: व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली.

१९८६: अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला.

१९९३: वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले. या सदस्यांना प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराबाबत मत देण्याचा अधिकार आहे.

१९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण.

२००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.

२००७: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

पं. विनायकराव पटवर्धन
पं. विनायकराव पटवर्धन

१८९६: बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता.

१८८७: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म.

१८९८: पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)

१८९९: मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९८०)

१९०८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९९८)

मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश
मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश

१९२३: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)

१९२५: गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक

गोविंद तळवलकर
गोविंद तळवलकर

१९२७: भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५)

१९३२: आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००५ – मुंबई, महाराष्ट्र)

१९३७: वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)

इन्दर लाल रॉय
इन्दर लाल रॉय

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१२७६: पोप इनोसंट पाचवा.

१४२९: गियात अल काशी, पर्शियन अंतराळतज्ञ व गणितज्ञ.

१९१८: इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८)

१९४०:  ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.

१९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)

१९८४: गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक (जन्म: ? ? १९०९)

डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ
डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ

१९९३: चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन.

१९९४: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०८)

१९९५: हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)

२००१:  डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ.

२००३: उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (जन्म: १८ जून १९६५)

२००३: कुसय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (जन्म: १७ मे १९६६)

२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामा नारायणन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९४९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *