बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)
बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख होतो.

जन्म२३ जुलै १८५६, चिखली रत्नागिरी, महाराष्ट्र
मृत्यू १ ऑगस्ट १९२०, मुंबई
चळवळ भारतीय स्वातंत्र्यलढा
टोपणनाव लोकमान्य टिळक 
कार्य शिक्षण पूर्ण झाल्यांनतर त्यांनी शिक्षण क्षेत्रातही काम केले. १८८० मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि १८८५ मध्ये फर्गुसन कॉलेजची स्थापना केली. ते त्या काळातील भारतातील प्रमुख नेते, समाज सुधारक, स्वातंत्र्यसेनानी होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ते पहिले लोकप्रिय नेते होते. टिळकांनी ब्रिटिश राज दरम्यान सर्वप्रथम पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. टिळकांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ हे वाक्य खूप प्रसिद्ध होते. त्यांना लोक ‘लोकमान्य’ नावाने बोलावून सन्मानित करत असत. त्यांना हिंदू राष्ट्रवाद पिता म्हणूनही ओळखले जाते.
धार्मिक कार्य टिळकांनी जनजागृतीसाठी महाराष्ट्रामध्ये गणेशोस्तव आणि शिवाजीउत्सव असे कार्यक्रम सुरु केले. ह्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी सर्वसामान्य जानतेमध्ये देशप्रेम आणि इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे साहस भरण्याचा प्रयत्न केला. टिळकांच्या ह्या क्रांतिकारी पाउलामुळे इंग्रज घाबरले आणि त्यांनी लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालविला आणि त्यांना सहा वर्षाच्या शिक्षा सुनावली. टिळकांना ब्रम्हादेशातील मंडाले तुरुंगात पाठविण्यात आले होते. याच कालखंडमध्ये टिळकांनी गीतेचा अभ्यास करून गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. जेव्हा टिळक तुरुंगातून बाहेर आले त्यानंतर त्यांचा गीता रहस्य ग्रंथ प्रकाशित झाला आणि त्याचा प्रसार वाऱ्यासारखा झाला आणि जनसामन्यामध्ये आंदोलित होण्याची साधना निर्माण झाली.
वृत्तपत्रे टिळकांनी १८८१ मध्ये मराठा आणि केसरी ही दोन वर्तमानपत्रे सुरु केली. मराठा हे इंग्रजीतून तर केसरी हे मराठीतून प्रकाशित होत होती. १८८२ च्या अखेरीस केसरी हे सर्वाधिक खपाचे प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्र होते. ह्या दोन्ही वर्तमानपत्रांच्या सहाय्याने त्यांनी इंग्रज कशाप्रकारे भारतियांविरुद्ध क्रूर आहेत आणि भारतीय संस्कृती प्रती त्यांची असणारी हीनभावना यांचे आलोचना करत. त्याचप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकारला अनेक वेळा भारतीयांना पूर्णपणे स्वराज्य देण्याची मागणी केली, त्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगात ही जावे लागले.
टिळक क्रांतिकारी विचारांचे होते. अशा ह्या वीर स्वातंत्र्यता सेनानीचे १ ऑगस्ट १९२० ला मुंबई येथे निधन झाले.

बालपण

बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)
बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)

टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीमधील चिखलीमध्ये, एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्नागिरीजवळील चिखलीचे खोत होते. त्यांचे वडील गंगाधर टिळक प्रसिध्द शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार होते आणि त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. अभ्यासासोबतच ते दररोज नियमित व्यायाम करत असत त्यामुळे त्यांचे शरीर स्वस्थ आणि पुष्ट होते. १८७७ मध्ये त्यांनी बीए पूर्ण केले. 

ग्रंथसंपदा

  • आर्क्टिक होम ऑफ वेदाज
  • ओरायन
  • गीतारहस्य
  • टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
  • टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
  • वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)
  • Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे.
  • The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.