पुणे विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक असून पुणे विभाग हा पश्चिमेला कोकण विभाग, उत्तरेला नाशिक विभाग, पूर्वेला औरंगाबाद विभाग तर दक्षिणेला कर्नाटक राज्य असा चहुबाजूंनी बांधला गेला आहे.

क्षेत्रफळ५८,२६८ वर्गकिमी
जिल्हेपुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
साक्षरता७६.९५%
मुख्य पीकेज्वारी, गहू, बाजारी, ऊस, तांदूळ, सोयाबीन, कांदा, भुईमूग, भाज्या, द्राक्ष, डाळिंब
सर्वात मोठे शहरपुणे
सर्वाधिक विकसित शहरपुणे
सर्वाधिक साक्षरता असलेले शहर पुणे

पुणे विभगातील प्रशासकीय जिल्ह्यांचा इतिहास: १९४७ मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पुणे विभगातील काही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली तर काही नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली या निर्मिती दरम्यान सांगली जिल्यामध्ये मिरज, औंध, सांगली, तासगाव, कुरुंदवाड़ ही संस्थाने विलीन करण्यात आली होती.
दूसरे महत्त्वाचे म्हणजे पूना जिल्ह्याचे पुणे जिल्ह्यात नामांतरण करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव असून पंढरपूर हा नवीन जिल्हा वनविला जाईल त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातीलच पंढरपूर, संगोला, कर्माळा, मंगलवेढा, माळशिरस, माढा आणि सांगली जिल्ह्यातील जथ, आटपाडी तालुक्यांचा समावेश करण्यात येईल.
पुणे जिल्ह्याचेही विभाजन प्रस्ताव असून पुणे जिल्ह्यातून बारामती जिल्हा तयार करण्यात येणार आहे. बारामती जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातीलच शिरूर, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करण्यात येईल.
सातारा जिल्ह्याचेही विभाजनाचा प्रस्ताव असून सातारा जिल्ह्यातून कराड हा जिल्हा बनविण्यात येईल. कराड जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यातीलच कराड, पाटन आणि सांगली जिल्ह्यातील वलवा, कडेगाव, शिराळा तालुक्यांचा समावेश करण्यात येईल.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.