pratapgarh fort
pratapgarh fort

प्रतापगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असून जिल्ह्यातील मोठा किल्ला आहे. प्रतापगड किल्ला प्रतापगडावरील लढाईसाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे सध्या प्रतापगड महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. हा किल्ला १६५६-१८१८ पर्यंत मराठ्यांच्या अधिपत्त्याखाली होता टार १८१८-१९४७ ब्रिटिश राज, आणि आता भारताकडे आहे.

भौतिक माहिती:

प्रतापगड पोलादपुरपासून अवघ्या १५ किमी अंतरावर आहे तर महाबळेश्वरच्या पश्चिमेला २३ किमी अंतरावर आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३५४० फुट (१०८० मीटर) उंचीवर आहे.


इतिहास:

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरु झाले. नीरा नदी आणि कोयना नदी यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता. १६५६ मध्ये प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. १० नोव्हेम्बर १६५९ ला शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खरया अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. १६५९ ते १८१८ या प्रदीर्घ कलावधीमध्ये १६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रुला कधीच मिळाला नाही.

बांधकाम:

किल्ल्याची वरचा किल्ला आणि खालच्या किल्ला अशा दोन भागांमध्ये विभागणी केली जाऊ शकते.
वरचा किल्ला हा डोंगराच्या माथ्यावर बंधाला गेला असून तो प्रामुख्याने चौकानाकार आहे आणि त्याची प्रत्येक बाजू १८० मीटरची आहे. किल्ल्यावर काही कायमस्वरूपी इमारती आहेत

उदा. शंभू महादेवाचे मंदिर. हे मंदिर किल्ल्याच्या वायव्येला असून पूर्णपणे कड्याने वेढले आहे.
खालचा किल्ला, किल्ल्याची ही बाजू ३२० मीटर लांब तर ११० मीटर रुंद आहे. ही बाजू किल्ल्याच्या अग्नेयाला असून १० ते १२ मीटर ऊंच बुरुज ह्याच्या संरक्षणासाठी उभारले गेले आहेत.
प्रतापगडाच्या लढाईनंतर अफझल बुरुज उभारला असून बुरुजाखाली अफझलखानाचे मुंडके पुरून ठेवले आहे असे बोलले जाते.


शिवरायांना तुळजा भवानीच्या भेटीला जाणे शक्य नव्हते म्हणून महाराजांनी १६६१ मध्ये गडावरच भवानीचे मंदिर बांधले. हे मंदिर खालच्या किल्याच्या पूर्वेला आहे. भवानीच्या मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढतांना उजव्या हातास श्री समर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. किल्ल्यावर शिवरायांचा अश्वारूढ़ पुतळा व छोटी बाग आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला दुपदरी बांधणीचा यशवंत व रेडका बुरुज आहेत. या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. ह्या खेरीज गडावर वेताळाचे मंदिर, स्वयंभू केदारेश्वराचे मंदिर, घोरपडीचे चित्र, कडेलोट, सूर्य बुरुज इ. ठिकाणे आहेत.


गडापासून अगन्येला काही अंतरावर अफझल खानाचा दर्गा आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.