१४ नोव्हेंबर दिनविशेष - 14 November in History
१४ नोव्हेंबर दिनविशेष - 14 November in History

हे पृष्ठ 14 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 14 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

बाल दिन (भारत)

बाल दिन (भारत)

महत्त्वाच्या घटना:

१६८१: आजच्याच दिवशी ईस्ट कंपनीने बंगाल ला वेगळे प्रांत बनविण्याची घोषणा केली होती.

१७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.

१९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

१९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना

१९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
???? : दर वर्षी या दिवशी नेहरू पुरस्कार देण्यात येतात.

१९७३: आजच्याच दिवशी ब्रिटेन राजघराण्यातील राजकुमारी ‘ऐन’ ने इतिहासत प्रथमच एका सामान्य व्यक्तीशी विवाह केला होता, तत्पूर्वी असे कधीही घडले न्हवते.

१९७५: स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.

१९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

२००२: तत्कालीन चीनचे राष्ट्रपती जियांग जेमिन यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर

२००६: भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांतील विदेश सचिवांनी आजच्याच दिवशी दिल्ली येथे बैठकीत आतंकवाद विरोधी कार्यपध्दती विकसित करण्याचे धोरण ठरविले.

२००७: डेन्मार्क या देशाचे पंतप्रधान आंद्रे फाग यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

२०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६५०: विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ८ मार्च १७०२)

१७६५: रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

१७१९: लिओपोल्ड मोत्झार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक आणि जगप्रसिद्ध वूल्फगँग मोत्झार्टचे वडील (मृत्यू: २८ मे १७८७)

१८६३: लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्‍न
पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्‍न

१८८१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)

१८८९: पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्‍न [१९५५] (मृत्यू: २७ मे १९६४)

१८९१: बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)

१९०४: हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २२ जुलै १९९५)

१९०७: हिंदी भाषेचे प्रसिध्द भारतीय साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांचा जन्म झाला होता.

१९१७: प्रसिध्द हिंदी साहित्यकार गजानन मुक्तिबोध यांचा जन्म झाला होता.

१९१८: रघुवीर मूळगावकर – चित्रकार (मृत्यू: ३० मार्च १९७६)

१९१९: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (मृत्यू: २६ आक्टोबर १९९१)

१९२२: ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली – संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस

१९२२: अमेरिकेची अभिनेत्री वेरोनिका लेक हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

१९२४: रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका (मृत्यू: १० आक्टोबर २००८)

हृषिकेश कानिटकर
हृषिकेश कानिटकर

१९२६: उदारवादी धोरणाचे पुरस्कर्ते व मुक्त आर्थिक व्यवहार नीतीचे खंदे समर्थक पिलू मोदी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

१९३५: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)

१९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)

१९७१: अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट – ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज

१९७४: हृषिकेश कानिटकर – क्रिकेटपटू

सी. के. नायडू – क्रिकेटपटू
सी. के. नायडू – क्रिकेटपटू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९१५: बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (जन्म: ५ एप्रिल १८५६)

१९६७: सी. के. नायडू – क्रिकेटपटू (जन्म: ३१ आक्टोबर १८९५)

१९७१: नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. ’सुखाचा मूलमंत्र’, ’पहाटेपुर्वीचा काळोख’, ’उमज पडेल तर’, ’एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या होत. ’कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ’न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)

डॉ. मणिभाई भीमभाई देसाई
डॉ. मणिभाई भीमभाई देसाई

१९७७: अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (जन्म: १ सप्टेंबर १८९६)

१९९३: डॉ. मणिभाई भीमभाई देसाई – स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्‍चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार (जन्म: २७ एप्रिल १९२०)

२०००: प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)

२०१०: भारताचे प्रसिध्द अर्थशास्त्री लक्ष्मीचंद जैन यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते.

२०१३: प्रसिध्द बाल साहित्यकार व संपादक हरिकृष्ण देवसरे यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.

२०१५: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *