७ फेब्रुवारी दिनविशेष - 7 February in History
७ फेब्रुवारी दिनविशेष - 7 February in History

हे पृष्ठ 7 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 7 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • वन अग्नि सुरक्षा दिवस.
  • ’ग्रेनाडा’चा स्वातंत्र्यदिन
  • व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात. (रोस डे)

महत्त्वाच्या घटना:

रमाकांत आचरेकर
रमाकांत आचरेकर

१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील ‘आर्यन’ हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.

१९२०: बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९७४: ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.

१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी

२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

२०१०: आजच्या दिवशी अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचा समारोप झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.

१८०४: डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)

एस. रामचंद्रन पिल्ले
एस. रामचंद्रन पिल्ले

१८१२: चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू: ९ जून १८७०)

१८७३: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)

१८९८: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म.

१९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)

१९३४: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)

१९३८: एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते

१९८०: चित्रपट अभिनेत्री प्राची शाह यांचा जन्म.

१९९३: प्रसिद्ध टेनिसपटू किदंबी श्रीकांत चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१२७४: श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१)

१३३३: निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.

१९३८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म: २० डिसेंबर १८६८)

१९४२: आजच्या दिवशी “हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन” ची स्थापना करणारे शचींद्रनाथ सान्याल यांचे निधन.

१९९९: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *