हे पृष्ठ 9 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

पृष्ठावर, आम्ही 9 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 9th June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक ऐंटिफॉस्फोलिपिड सिंड्रोम (एपीएस) दिवस (World Antiphospholipid Antibody Syndrome (APS) Day)
  • डोनाल्ड डक डे (Donald Duck Day): नॅशनल डोनाल्ड डक डे दरवर्षी 9 जून रोजी एका मजेदार अॅनिमेटेड कार्टून पात्राच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. डोनाल्ड डकने 9 जून 1934 रोजी द वाईज लिटल हेन या चित्रपटातून पहिले पडद्यावर पदार्पण केले.
  • कोरल त्रिकोण दिवस (Coral Triangle Day): सागरी जैवविविधतेचे जगाचे केंद्रबिंदू असलेल्या कोरल ट्रँगलवर, विशेषत: सागरी जैवविविधतेचे केंद्रबिंदू असलेल्या सागरी संवर्धन आणि संरक्षणाविषयी जागरुकता साजरी करण्यासाठी आणि जागरुकता वाढवण्यासाठी 9 जून रोजी प्रवाळ त्रिकोण दिवसाची स्थापना करण्यात आली.

महत्त्वाच्या घटना:

लालबहादूर शास्त्री
लालबहादूर शास्त्री

२००६ : १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.

२००४: कॅसिनी-हायगेन्सअंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

२००१ : भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

१९८६ : मुंबई येथे पहिला एड्स रुग्ण सापडला.

१९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

१९७५ : ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.

१९७४ : सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

१९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर

१९६४ : भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.

१९४६ : राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.

१९३५: एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

१९३४ : डोनाल्ड डकचे चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.

१९३१ : रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.

१९२३ : बल्गेरियात लष्करी उठाव झाला.

१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

१९०६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण

१९००: भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.

१८९० : गिरणी कामगारांची रविवारच्या साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य होऊन साप्ताहिक सुट्टी सुरुवात झाली.

१८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

१७०० : दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

१६९६ : छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव ’शिवाजी’ असे ठेवले.

१६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

६८ : रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.

George Stephenson
George Stephenson

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६७२: रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५)

१७८१ : जॉर्ज स्टिफन्सन, आगगाडीचा जनक.

१८४५: भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९१४)

kiran bedi
kiran bedi

१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म.

१९१२: संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)

१९३१: भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट २००६)

१९४९: सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म.

१९८१: इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

बंदा बहादुर, शीख सेनापती.
बंदा बहादुर, शीख सेनापती.

६८: ६८ई.पुर्व : रोमन सम्राट नीरो यांनी आत्महत्या केली. (जन्म: १५ डिसेंबर ३७)

१७१६ : बंदा बहादुर, शीख सेनापती.

१८३४: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)

१८७०: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)

१९००: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. (जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)

प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.
प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.

१९४६: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १९२५)

१९८८: अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन.

१९९३: बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९९५: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन.(जन्म: ७ नोव्हेंबर १९००)

१९९७: इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.

१९९१ : राज खोसला, सुप्रसिध्द चित्रपट निर्माता.

२०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.

२०११: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.