१३ नोव्हेंबर दिनविशेष - 13 November in History
१३ नोव्हेंबर दिनविशेष - 13 November in History

हे पृष्ठ 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 13 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.

रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथ टागोर

१८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.

१९१३: रविंद्रनाथ टागोर यांच्या ’गीतांजली’ला नोबेल पारितोषिक

१९२१: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.

१९३१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.

१९४७: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.

१९६८: पाकिस्तान मध्ये आजच्या दिवशी झुल्फिकार अली भुट्टो यांना अटक करण्यात आली होती.

१९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.

१९७१: अमेरीकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे पाठविलेले यान मरिनर -९ आजच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचले होते.

१९७५: जागतिक आरोग्य संघटनेने आजच्याच दिवशी आशिया खंडातून देवी या रोगाचा समूळ नायनाट झाल्याची घोषणा केली होती.

१९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.

१९९७: सुरक्षा परिषदेने इराक या देशावर यात्रेवर निर्बंध लावले होते.

१९९८: चीन च्या विरोधाला झुगारून आजच्याच दिवशी दलाई लामा व तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती बील क्लिंटन यांनी एकमेकांची भेट घेतली होती.

२००४: तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आजच्याच दिवशी फिलीस्तीन देशाच्या निर्मितीकरिता चार वर्षांचा कार्यकाल ठरविला होता.

२००८: ‘असम गणपरीषद ‘ संघटन आजच्याच दिवशी राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन नावाच्या पक्षात समाविष्ट झाले होते.

२००९: झारखंड या राज्यात आजच्याच दिवशी नक्सलवादी संघटनेने नेते रामचंद्र सिंह यांच्या समवेत ईतर सात लोकांचे अपहरण केले होते.

२०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७८०: महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (मृत्यू: २७ जून १८३९)

१८५०: आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)

गजानन माधव मुक्तिबोध
गजानन माधव मुक्तिबोध

१८५५: गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (मृत्यू: १४ जून १९१६)

१८७३: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (मृत्यू: १० मार्च १९५९)

१८९८: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६९)

१९१७: गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)

वसंतदादा पाटील
वसंतदादा पाटील

१९१७: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (मृत्यू: १ मार्च १९८९)

१९५४: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म.

१९६७: प्रसिध्द भारतीय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

१९६८: हिंदी चित्रपट सृष्टी तील प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५८९: लाहोर या ठिकाणी भगवान दास यांचे निधन झाले होते.

१७४०: कृष्णदयार्णव – प्राचीन मराठी कवी. त्यांचा ’हरिवरदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. (जन्म: ? ? १६७४)

१९५६: इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल))

२००१: अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)

२००२: ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते (जन्म: ? ? १९२५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *