१८ ऑगस्ट दिनविशेष - 18 August in History
१८ ऑगस्ट दिनविशेष - 18 August in History

हे पृष्ठ 18 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १८ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 18 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन
  • जागतिक हेलियम दिवस: 18 ऑगस्ट हा ‘जागतिक हेलियम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 1868 मध्ये या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव ‘हेलियस’च्या नावावरून हेलियम हे नाव पडले. सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या प्लॅटफॉर्मवरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो. 

महत्त्वाच्या घटना:

१८००: ब्रिटीश कालीन भारतात कलकत्ता या ठिकाणी (Richard Wellesley) यांनी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली.

१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना

१८६८: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्यूलस जानसेन(Pierre Janssen) यांनी हेलियम वायूचा शोध लावला.

१९२०: अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. पुरुषांच्या सोबत आपल्यालाही मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अमेरिकेतल्या स्त्रियांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आणि 18 ऑगस्ट 1920 साली अमेरिकेतल्य स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.

१९४२: शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.

१९४५: इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले.

१९४९: हंगेरी राष्ट्राने प्रजासत्ताक राष्ट्राची घटना स्वीकारली.

१९५१: पहिल्या पंचवार्षिक योजणे दरम्यान पश्चिम बंगाल मधील खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली.

१९५८: बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.

१९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.

१९९९: कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्‍च न्यायालयाने स्पष्ट केले.

परवेझ मुशर्रफ
परवेझ मुशर्रफ

२००५: ईंडोनेशियाच्या जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटि लोक अंधारात

२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.

२०१८: इमरान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

प्रीती जंघियानी – अभिनेत्री
प्रीती जंघियानी – अभिनेत्री

१७००: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)

१७३४: रघुनाथराव पेशवा (११ डिसेंबर १७८३)

१७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.

१८७२: ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)

१८८६: सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)

१९००: विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (मृत्यू: १ डिसेंबर १९९०). संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित यांचा आज जन्मदिवस आहे. विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 रोजी झाला. त्या पंडित नेहरुंच्या भगिनी होत्या. 1953 ते 1954 या काळात त्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या आठव्या अध्यक्षा होत्या.

१९२३: सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (मृत्यू: २२ जून १९५५)

१९३४: संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ’गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक व दिग्दर्शक

दलेर मेहंदी – भांगडा गायक
दलेर मेहंदी – भांगडा गायक

१९३६: रॉबर्ट रेडफोर्ड – हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी आणि दानशूर

१९५६: संदीप पाटील – धडाकेबाज फलंदाज

१९६७: दलेर मेहंदी – भांगडा गायक / पंजाबी पॉप गायक

१९८०: प्रीती जंघियानी – अभिनेत्री

पर्सिस खंबाटा
पर्सिस खंबाटा

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१२२७: मंगोल सम्राट चंगीझ खान यांचे निधन.

१८५०: फ्रेंच लेखक ऑनोरे दि बाल्झाक यांचे निधन.

१८८६: मॉर्टिस लॉक चे शोधक एली व्हिटनी ब्लेक यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७९५)

१९१९: सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८४१)

१९४०: वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (जन्म: २ एप्रिल १८७५)

१९४५: नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)

नेताजी सुभाषचंद्र बोस
नेताजी सुभाषचंद्र बोस

१९७९: वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: १ जुलै १९१३)

१९९०: प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार, प्रचारक व सरस्वती पत्रिकेचे संपादक तथा पत्रकार श्री नारायण चतुर्वेदी यांचे निधन.

१९९८: पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (जन्म: २ आक्टोबर १९४८)

२००८: नारायण धारप – रहस्यकथाकार (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)

२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.

२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *