१५ एप्रिल दिनविशेष - 15 April in History
१५ एप्रिल दिनविशेष - 15 April in History

हे पृष्ठ 15 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 15th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

१८९५: साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील थोर समाजसुधारक व क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम कोकणातील रायगड किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती साजरी केली.

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

१९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.

१९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.

१९९४: भारताने गॅट करारास मान्यता दिली.

१९९७: मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

१९९८: थम्पी गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले फ्रेडरिक लेंज यांचे निधन.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४५२: लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार.

१४६९: गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)

१५६३: शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देव यांचा जन्मदिन.

१७०७: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)

१७४१: चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)

१८९३: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)

१८९४: निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)

१९०१: अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.

१९१२: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (मृत्यू: १३ जानेवारी १९९७)

१९१२: किम सुंग (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जुलै १९९४)

१९२२गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९)

१९३२: कवी सुरेश भट यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च २००३)

१९४०: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शिखर घराण्यातील शास्त्रीय गायक व सारंगी वादक उस्ताद सुलतान खान यांचा जन्मदिन.

१९६३: भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म.

१९७२: प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्या, क्रिकेट ग्लॅमर, फॅशन मूर्ती मंदिरा बेदी यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७९४: मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ’मोरोपंत’ – पंडीतकवी [चैत्र शु. १५] (जन्म: ? ? १७२९)

१८६५: अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष.

१९१२: जगप्रसिध्द टायटॅनिक बोटीला धक्का लागून जलसमाधी मिळाल्याने अनेक लोकांचा मृत्यू.

१९१२: एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (जन्म: २७ जानेवारी १८५०)

१९८०: जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २१ जून १९०५)

१९९०: ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९०५)

१९९५: पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: ? ? ????)

१९९८: पॉल पॉट – कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ’ख्मेर रुज’चा नेता (जन्म: १९ मे १९२५)

२०१३: वि. रा. करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *