आचार्य विनोबा भावे
आचार्य विनोबा भावे

हे पृष्ठ 11 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ११ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 11 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.

१७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.

१७९२: होप हिरा चोरला गेला.

१८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.

१९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

१९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.

मधुकर तोरडमल
मधुकर तोरडमल

१९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.

१९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.

१९६१: ’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.

१९६५: भारत पाक युद्ध – भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

१९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.

२००१: अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.

 

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८१६: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.

१८६२: इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.

१८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)

१८८५: डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (मृत्यू: २ मार्च १९३०)

१८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.

१८९५: आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न – १९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)

१९०१: आत्माराम रावजी देशपांडे तथा ‘कवी अनिल’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, ’प्रेम आणि जीवन’, ’ भग्नमूर्ती’, ’चिनी मुलास’, ’निर्वासित’ ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले होते. (मृत्यू: ८ मे १९८२)


१९११
: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)

१९१५: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (मृत्यू: २९ मार्च १९९७)

१९१७: फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)

१९३९: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.

१९८२: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.

१९८३: विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

१९७६: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.

१९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.

आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल
आत्माराम रावजी देशपांडे तथा ‘कवी अनिल

 

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९२१: सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (जन्म: ११ डिसेंबर १८८२)

१९४८: बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: २५ डिसेंबर १८७६)

१९६४: गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

१९७१: निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १८९४)

१९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.

१९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.

१९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.

१९८७: महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (जन्म: २६ मार्च १९०७)

गजानन माधव मुक्तिबोध
गजानन माधव मुक्तिबोध

१९९८: क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म: १० आक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *