२८ सप्टेंबर दिनविशेष - 28 September in History
२८ सप्टेंबर दिनविशेष - 28 September in History

हे पृष्ठ 28 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 28 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक रेबीज दिन World Rabies Day

जागतिक रेबीज दिन

जागतिक रेबीज दिन ही एक आंतरराष्ट्रीय जागरुकता मोहीम आहे ज्याचे समन्वय ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल, युनायटेड स्टेट्समधील मुख्यालय असलेली ना-नफा संस्था आहे.

  • जागतिक कर्णबधिर दिन
  • Green Consumer Day
  • आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन
  • आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन

महत्त्वाच्या घटना:

१८३७: साली अंतिम भारतीय मुघल सम्राट बहादूर शहा द्वितीय दिल्ली येथील सम्राट बनले.

१९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

१९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.

लता मंगेशकर
लता मंगेशकर

१९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९५०: इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९५८: साली फ्रांस देशांत संविधान आमलात आणण्यास मंजुरी देण्यात आली.

१९६०: माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९९९: महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर

विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकर

२०००: विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर

२००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.

२००८: साली स्पेसएक्स कंपनीने बनविलेले फाल्कन 1 हे यान पृथ्वीच्या कक्षेत जाणारे पहिले खासगी-विकसित द्रव-इंधन प्रक्षेपण वाहन बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८०३: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)

१८३६: बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९१०)

१८६७: जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म.

१८९८: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, हिंदू महसभेचे अध्यक्ष, देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला

१९०७: भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९०९: पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)

१९२५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.

१९२९: लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्‍न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण

१९६६: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.

१९४६: माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान

१९४७: शेख हसीना – बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान

१९४९: साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी ४०वे सरन्यायाधीश राजेंद्रमल लोढा यांचा जन्मदिन.

रणबीर कपूर – अभिनेता
रणबीर कपूर – अभिनेता

१९८२: अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय

१९८२: रणबीर कपूर – अभिनेता

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८३७: साली भारतातील शेवटचे मुघल शासक बादशहा अकबर द्वितीय यांचे निधन.

१८९५: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १८२२)

१९३५: कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८६०)

१९५३: एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २० नोव्हेंबर १८८९)

१९५६: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (जन्म: १ आक्टोबर १८८१)

१९७०: इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे निधन.

१९८१: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोम्लो बेटानको यु र्ट यांचे निधन.

१९८९: फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)

१९९१: अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस यांचे निधन.

१९९२: मेजर ग. स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे

१९९४: भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९१७)

ब्रजेश मिश्रा
ब्रजेश मिश्रा

२०००: श्रीधरपंत दाते – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते

२००४: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (जन्म: १२ डिसेंबर १९०५)

२०१२: ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)

२०१२: माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक (शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल, सागर, चमत्कार), फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले – १९७५) (जन्म: ?? ???? १९२९)

२०१५: साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, शैक्षणिक आणि पत्रकार वीरेन डंगवाल यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *