महात्मा फुले
महात्मा फुले

हे पृष्ठ 23 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २३ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 23 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

२००२ : ’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

१९८३ : ’सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९०८ : कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना

१९०५ : आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी ‘कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.

१८७३ : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१८४६ : अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्‍यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

कूमार सानू – पार्श्वगायक
कूमार सानू – पार्श्वगायक

१९५७ : कूमार सानू – पार्श्वगायक

१९५२ : अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू

१९४३ : तनुजा – चित्रपट अभिनेत्री

१९२० : प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)

१९१९ : देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)

तनुजा - चित्रपट अभिनेत्री
तनुजा – चित्रपट अभिनेत्री

१९०८ : रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)

१९०३ : युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (मृत्यू: २ जुलै १९५०)

१८६१ : रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (मृत्यू: १२ मार्च १९४२)

१२१५ : कुबलाई खान – मंगोल सम्राट (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ
डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ

२०१२ : कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के. लाल – जादूगार (जन्म: ? ? १९२४)

२००४ : डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १९२५)

१९६४ : भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर – नाटककार (जन्म: २७ एप्रिल १८८३)

१९३९ : सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म: ६ मे १८५६)

१८८२ : फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १८००)

१८७० : प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)

१८५८ : ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.