६ नोव्हेंबर दिनविशेष - 6 November in History
६ नोव्हेंबर दिनविशेष - 6 November in History

हे पृष्ठ 6 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 6 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

१८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.

प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता, अर्जेंटिनाचे गांधी
प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता, अर्जेंटिनाचे गांधी

१९१३: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

१९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.

१९९६: ’अर्जेंटिनाचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते ’जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

१९९९: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ’युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर

डॉ. वासुदेव अत्रे
डॉ. वासुदेव अत्रे

२००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा ‘वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे ’धनुष’ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

२०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८८०: निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७)

दिनकर द. पाटील
दिनकर द. पाटील

१८६१: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९)

१८१४: अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (मृत्यू: ४ फेब्रुवारी १८९४)

१८३९: भगवादास इंद्रजी – प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ (मृत्यू: ? ? ????)

१८९०: बळवंत गणेश खापर्डे – कविभूषण, दादासाहेब खापर्डे यांचे सुपुत्र (मृत्यू: ? ? ????)

झिग झॅगलर
झिग झॅगलर

१९०१: श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

१९१५: दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (मृत्यू: २१ मार्च २००५)

१९२६: झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (मृत्यू: २८ नोव्हेंबर २०१२)

१९६८: याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.

प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर
प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७६१: औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेशी टक्‍कर देताना मराठेशाही वाचवणार्‍या महाराणी ताराबाई (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) यांचे निधन (जन्म: ? ? १६७५)

१८३६: चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ९ आक्टोबर १७५७)

१९८५: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (जन्म: ९ जुलै १९३८)

हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’
हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’

१९८७: प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (जन्म: २३ सप्टेंबर १९२०)

१९९२: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (जन्म: ६ डिसेंबर १९१६)

१९९८: अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)

’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार
’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार

२००२: स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.

२०१०: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)

२०१३: भारतीय शेफ तरला दलाल यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९३६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *