व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री
व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री

हे पृष्ठ 22 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २२ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 22 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

सुनील गावसकर

१९९८ : क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ’महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च सन्मान जाहीर

१९९५ : घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्‍च न्यायालयाचा निर्णय

१९९५ : श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले. यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.

१९८२ : कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९८० : इराकने इराण पादाक्रांत केले.

१९३१ : नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

१८८८ : ’द नॅशनल जिऑग्रॉफिक’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१६६० : शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

१४९९ : बेसलचा तह – स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अनंत माने

१९१५ : अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ९ मे १९९५)

१९०९ : दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक (मृत्यू: ३ आक्टोबर १९५९)

१८८७ : कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (मृत्यू: ९ मे १९५९)

१८६९ : व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)

१७९१ : मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

मन्सूर अली खान पतौडी

२०११ : मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब (जन्म: ५ जानेवारी १९४१)

१९९४ : जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (जन्म: ६ एप्रिल १९०९)

१९७० : शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (जन्म: ३० मार्च १८९९)

१९९१ : दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (जन्म: १४ जानेवारी १९०५)

१९५६ : फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज (जन्म: २ सप्टेंबर १८७७)

१५३९ : गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Join the Conversation

1 Comment

  1. hii ,
    If you have whatsapp group then please add me in that group …

    PRASHANTBANDGAR
    Whatsapp No- 9892319248

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *