२५ ऑगस्ट दिनविशेष - 25 August in History
२५ ऑगस्ट दिनविशेष - 25 August in History

हे पृष्ठ 25 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २५ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 25 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

Independence Day Of Uruguay

महत्त्वाच्या घटना:

सरोदवादक अमजद अली खाँ
सरोदवादक अमजद अली खाँ

१६०९: गॅलेलिओ गॅलिली याने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

१८२५: उरुग्वेने आपण (ब्राझिलपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

१९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस या शहरांदरम्यान सुरू झाली.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

१९५७: जयपूर येथील दिवंगत महाराजा सवाई मान सिंग द्वितीय यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पोलो संघाने फ्रांस मध्ये आयोजित विश्वकप जिंकला.

१९६०: इटलीतील रोम येथे १७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

१९९१: बेलारुसने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

१९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने ’लिनक्स’ (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

१९९७: दक्षिण कन्नडा (South Canara) जिल्ह्याचे विभाजन करुन ’उडुपी’ हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला.

१९९८: एनसायकक्लोपिडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली. या आवृत्तीतील भारताच्या सीमा चुकीच्या दाखवल्यामुळे तसेच जम्मू काश्मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

२००१: सरोदवादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

गंगाधर गाडगीळ – साहित्यिक
गंगाधर गाडगीळ – साहित्यिक

१९२३: गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)

१९२६: भारतीय लोकसभा सदस्य बाबुराव काळे यांचा जन्मदिन.

१९३०: शॉन कॉनरी – ’जेम्स बॉन्ड’च्या भूमिकांमुळे गाजलेला स्कॉटिश अभिनेता व निर्माता

१९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९)

१९४१: अशोक पत्‍की – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार तसचं, “मिले सूर मेरा तुम्हारा”, “पूरब से सूर्य उगा” या गीताचे रचनाकार

अशोक पत्‍की
अशोक पत्‍की

१९५२: दुलीप मेंडिस – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९५२: भारतीय राजकारणी आणि माजी चित्रपट अभिनेते तसचं, तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत यांचा जन्मदिन.

१९५७: सिकंदर बख्त – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज

१९६२: डॉ. तस्लिमा नसरीन – बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका

१९६५: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म.

१९६९: भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान यांचा जन्म.

१९९४: भारतीय लेखक आणि कादंबरीकार काजोल आयकट यांचा जन्म.

मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१२७०: लुई (नववा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २५ एप्रिल १२१४)

१८१९: जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता (जन्म: १९ जानेवारी १७३६)

१८२२: विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८)

हेन्‍री बेक्‍वेरेल
हेन्‍री बेक्‍वेरेल

१८६७: मायकेल फॅरेडे – विद्युत चुंबकीय यंत्राचा शोध लावणारे ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २२ सप्टेंबर १७९१)

१९०८: हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म: १५ डिसेंबर १८५२). नोबल पारितोषिक पुरस्कार सन्मानित किरणोत्सारी वर्गाचा शोध लावणारे महान फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता.

१९७२: प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते हरिभाऊ उपाध्याय यांचे निधन.

२०००: कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार (जन्म: २७ मार्च १९०१)

सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर
सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर

२००१: डॉ. वसंत दिगंबर तथा व. दि. कुलकर्णी – संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व समीक्षक. त्यांचे ’धुळाक्षरातून मुळाक्षराकडे’ हे आत्मचरित्र एका वेगळ्या स्वरुपामुळे गाजले.

२००१: असित सेन हिंदी व बंगालीतील अभिनेते, दिग्दर्शक, पटकथालेखक व छायालेखक
(जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

२००८: सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (जन्म: १२ जानेवारी १९३१)

नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव
नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव

२०१२: नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)

२०१३: भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३२)

२०१८: जॉन मैककेन, जॉन सिडनी मॅककेन तिसरा हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर.(जन्मतारीख: २९ ऑगस्ट, १९३६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *